‘हो, उडवं त्याला उडवं...’ तरुणांनी विनाकारण वृद्धाला उडवलं; धक्कादायक Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 13:38 IST2023-09-18T13:36:25+5:302023-09-18T13:38:06+5:30

या घटनेत 64 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

teen-intentionally-hit-cyclist-in-in-us-died-on-the-spot-shocking-video-went-viral | ‘हो, उडवं त्याला उडवं...’ तरुणांनी विनाकारण वृद्धाला उडवलं; धक्कादायक Video व्हायरल

‘हो, उडवं त्याला उडवं...’ तरुणांनी विनाकारण वृद्धाला उडवलं; धक्कादायक Video व्हायरल

सोशल मीडियावर अपघातांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ सौम्य तर काही अतिशय भीषण असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या अस्वस्थ करणाऱ्या व्हिडिओत दोन कारस्वार तरुणांनी विनाकारण एका सायकलस्वार वृद्धाला कारने उडवल्याचे दिसत आहे. वृद्धाला उडवून कारस्वार पळून जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदय पिळवटून टाकणारे घटना अमेरिकेतील लास वेगास येथील आहे. या घटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गाडीमधील एक तरुण म्हणतोय, 'हो, ठोक त्याला ठोक...' या जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. 

लास वेगास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंद्रियास प्रॉब्स्ट(64) असे मृताचे नाव असून, ते निवृत्त पोलीस अधिकारी होते. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6 च्या सुमारास आंद्रियास सायकलवरुन जात होते. यावेळी कारमधील तरुणांनी त्यांना मुद्दाम धडक दिली. आंद्रियास यांना तातडीने युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले, तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Web Title: teen-intentionally-hit-cyclist-in-in-us-died-on-the-spot-shocking-video-went-viral