अमेरिकेत भारतीय विद्यार्थी टार्गेट; एक आढळला मृतावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 07:09 AM2024-02-08T07:09:42+5:302024-02-08T07:10:22+5:30

एक आढळला मृतावस्थेत; अन्य एकाला शिकागोत बेदम मारले

Target Indian Students in America; One was found dead | अमेरिकेत भारतीय विद्यार्थी टार्गेट; एक आढळला मृतावस्थेत

अमेरिकेत भारतीय विद्यार्थी टार्गेट; एक आढळला मृतावस्थेत

न्यूयॉर्क : अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांबाबत अस्वस्थता वाढविणाऱ्या घटना घडत आहेत. इंडियानातील पर्ड्यु विद्यापीठात पीएच.डी. करत असलेला एक भारतीय विद्यार्थी मृतावस्थेत आढळून आला. तर शिकागोमध्ये आयटीचे शिक्षण घेणऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याला त्याच्या घराजवळ बेदम मारहाण करण्याची घटना घडली.

यंदाच्या वर्षात आतापर्यंत भारतीय विद्यार्थ्यांबाबत सहा दुर्घटना घडल्या आहेत. पर्ड्यू विद्यापीठामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात पीएच.डी. करत असलेला विद्यार्थी समीर कामत याचा वॅरेन काऊंटी येथे सोमवारी मृतदेह आढळला. दुसऱ्या घटनेत आयटी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या सय्यद मजहीर अली या भारतीय विद्यार्थ्याचा काही अज्ञात व्यक्तींनी पाठलाग करून त्याला बेदम मारहाण केली.  (वृत्तसंस्था)

डोळ्यावर, चेहऱ्यावर मारले ठोसे
nसय्यद मजहीर अली आपल्या घराकडे जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्याचा पाठलाग केला. एकाने त्याच्या डोळ्यावर व चेहऱ्यावर ठोसे मारले.
nत्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. एकाने त्याच्यावर बंदूकही रोखली.
nसय्यदला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
nइंडियाना वेस्लेयन विद्यापीठात सय्यद हा आयटी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

Web Title: Target Indian Students in America; One was found dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.