Afghanistan: तालिबानचा धोका वाढला, 50 इंडियन डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 11:19 AM2021-07-11T11:19:10+5:302021-07-11T11:41:58+5:30

Indian Diplomats and Officials Evacuated from Afghanistan's Kandahar Consulate: देशातील 85% भागावर कब्जा केल्याचा तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा

Taliban threat rises in Afghanistan, 50 Indian diplomats and staff leaves embassy | Afghanistan: तालिबानचा धोका वाढला, 50 इंडियन डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले

Afghanistan: तालिबानचा धोका वाढला, 50 इंडियन डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले

Next
ठळक मुद्दे भारतात तालिबानच्या 20 पेक्षा जास्त मित्र संघटना कार्यरत

कांधार: अमेरिकेच्या फौजांनी माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबान अधिक आक्रमक होत आहे. अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या वर्चस्वाने अमेरिका, रशिया आणि भारतासह अनेक देशांचा अडचणी वाढवल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगानिस्तानातील दक्षिणेकडे असलेल्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या दाव्यांतर भारताने कांधारमधील वाणिज्य दूतावासातून 50 डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना भारतीय वायुसेनेच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले आहे. 

भारतीयांना बाहेर काढण्याची योजना तयार

भारताने काबूल, कंधार आणि मझार शरीफ येथे असलेले आपले कर्मचारी आणि इतर भारतीयांना अफगाणिस्तान बाहेर काढण्याची योजना भारताने तयार केली आहे. अफगाणिस्तानातील शहरे व ग्रामीण, दुर्गम भागातील सुरक्षा परिस्थिती गंभीर होतेय. यामुळे दूतावासांचे कामकाज अवघड होत चालले आहे. अफगाण अधिकारी स्वतःच तालिबान हल्ल्याच्या भीतीने सरकारच्या नियंत्रणातील प्रदेशातून पळ काढत आहेत, असे सांगितले जात आहे. 

सरकारचा दावा- बंद होणार नाही दूतावास
तालिबानचा प्रवक्ता सुशील शाहीनने चीनी मीडिया साउथ चायना मॉर्निंग पोस्टला दिलेल्या मुलाखतीत तालिबानकडून अफगानिस्तानातील 85% भागांवर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, भारत सरकारने यापूर्वी अनेकदा कांधार आणि मजार-ए-शरीफचे दूतावास बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, या दूतावासातून दररोज चालणारी कामेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात तालिबानच्या 20 पेक्षा जास्त मित्र संघटना कार्यरत

भारतात अफगानिस्तानचे राजदूत फरीद मामुंडजेने सांगितल्यानुसार, भारतात तालिबानच्या 20 पेक्षा जास्त मित्र संघटना आहे. या संघटना रशियापासून भारतापर्यंत काम करतात. तालिबानचे वर्चस्व वाढवण्यासाठी या संघटना काम करतात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Taliban threat rises in Afghanistan, 50 Indian diplomats and staff leaves embassy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.