शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

काबूलमध्ये तालिबानचा आत्मघातकी हल्ला. 95 ठार तर 163 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 19:17 IST

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 95 लोकांचे प्राण गेल्याचे तसेच 163 लोक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिद मजरुह यांनी दिली आहे.

काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 95 लोकांचे प्राण गेल्याचे तसेच 163 लोक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिद मजरुह यांनी दिली आहे.या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली असून काबूलमध्ये असणाऱ्या गृहमंत्रालयाच्या जुन्या इमारतीवर हा हल्ला करण्यात आला आहे. स्फोटानंतर धुराचे प्रचंड लोट उठून काबूलचे आकाश काळवंडून गेल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी आपत्कालीन बचाव यंत्रणेच्या वाहनांनी धाव घेतली आहे. या हल्ल्यात किमान तीन स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

 

 

एका आठवड्यापुर्वी काबूलमधील इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्येही तालिबानने असाच हल्ला केला होता. त्यामध्ये 18 लोकांचे प्राण गेले होते. त्याच्या आदल्याच दिवशी जलालाबादमधील सेव्ह द चिल्ड्रेनच्या शाळेवर केलेल्या हल्ल्यामध्ये तालिबानने 3 मुलांची हत्या केली होती. आज काबूलमध्ये झालेल्या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण शहर हादरून गेल्याचे काही नागरिकांनी सांगितले.अफगाणिस्तानचे संसद सदस्य मिरवाईज यासिनी हे या हल्ल्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. "एक रूग्णवाहिका पोलिसांच्या चेकनाक्याजवळ आली आणि तेथील जमुरियत रूग्णालयात रूग्णाला घेऊन जात असल्याचे सांगत ते पुढे गेले. त्यानंतर दुसऱ्या चेकनाक्याजवळ आल्यानंतर त्यांनी स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा स्फोट घडवला'' असे यासिनी यांनी सांगितले.एएफपी वृत्तसंस्थेच्या वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, '' रूग्णालयाजवळ अनेक लोक मृत आणि जखमी अवस्थेत पडले होते. स्फोटाची तिव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या तसेच काही लहान बांधकामांचे नुकसानही झाले. जखमींची संख्या वाढत गेल्यावर जमुरियत रूग्णालयात एकच गोंधळ उडाला आणि त्यांना मदत करण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर्स व परिचारिकांनी बाहेर धाव घेतली. जखमींना उपचारासाठी नेण्यासाठी परिसरात राहाणाऱ्या लोकांनी मदत केली. 

टॅग्स :TerrorismदहशतवादAfghanistanअफगाणिस्तान