Taliban Pilots: हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 08:50 PM2023-02-12T20:50:50+5:302023-02-12T20:54:20+5:30

Taliban Pilots: तालिबान सरकारने या तीन वैमानिकांना फायटर प्लेन उडवण्याचे लायसेन्स दिले आहे.

Taliban Pilots: 'These' are pilots approved by the Taliban government in Afghanistan | Taliban Pilots: हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल

Taliban Pilots: हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल

googlenewsNext

Afghanistan Taliban Pilots:अफगाणिस्तानाततालिबान सत्तेवर आल्यापासून तिथे इस्लामिक पद्धतींची/कायद्याची चर्चा होत आहे. कट्टर तालिबानी नेते देशात कठोर इस्लामिक कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याच्या बाजूने आहेत. यातून विमानाचे वैमानिक किंवा क्रु मेंबर्सही सुटले नाही. यातच आता तेथील विमान प्रशिक्षण केंद्रातून विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या वैमानिकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वैमानिकांचा फोटो पाहून तुम्हीही चक्रावून जाल. फोटो दिसणारे 3 लोक पाहून अनेकांना हसायचं की घाबरायचं, हे ठरवता येत नाहीये. फोटोत 3 अफगाण पुरुष दिसत आहेत, ज्यांच्या डोळ्यात काजळ, डोक्यावर लांब केस आणि हातात लायसन्स आहे. शिवाय, त्यांचे लांबसडक केस, दाढी आणि पाय शूजशिवाय दिसत आहेत. त्यांची बसण्याची पद्धतही थोडी विचित्र दिसत आहे. 

तालिबानी वैमानिकांचा फोटो व्हायरल

पत्रकार असद हन्ना यांनी ट्विटरवर (@AsaadHannaa) हा फोटो शेअर केला आणि सांगितले की हे 3 'तालिबानी पायलट' आहेत, जे अफगाणिस्तानातील तालिबान केंद्रातून विमान उडवण्याची पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. त्या तिघांच्या प्रमाणपत्रावर हेलिकॉप्टरचे चित्रही दिसत आहे. हे प्रमाणपत्र त्यांचा पायलट असण्याचा परवाना असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रमाणपत्र तालिबान सरकारने त्यांना दिले आहे. अफगाणिस्तानमधील हा फोटो 8 व्या ब्रिगेडचे कमांडर जनरल हारून मोबारेज यांनीदेखील शेअर केले आहे. 

सोशल मीडियावर तालिबानचा जोक 
हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोवरुन लोक तालिबानला ट्रोल करत आहेत. बर्‍याच लोकांनी लिहिले की तालिबानने त्यांच्या पहिल्या 3 वैमानिकांना फ्लाइट सर्टिफिकेट दिले आहे. ही त्यांच्यासाठी थेट स्वर्गात जाणारी उड्डाण असेल. काहींनी लिहिले की, तालिबानच्या या फायटर पायलटला पाहून समोरच्या व्यक्ती चांगलाच घाबरेल.

Web Title: Taliban Pilots: 'These' are pilots approved by the Taliban government in Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.