इम्रान खान हे ISI च्या इशाऱ्यावर नाचणारी बाहुली, पाकिस्तान लवकरच उद्ध्वस्त होणार; तालिबानचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 17:14 IST2022-01-21T17:13:42+5:302022-01-21T17:14:18+5:30
Pakistan-Taliban Relations: तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इम्रान खान हे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या (ISI) इशाऱ्यावर नाचणाऱ्या बाहुलीसारखे आहेत, असं विधान तालिबानी नेत्यानं केलं आहे.

इम्रान खान हे ISI च्या इशाऱ्यावर नाचणारी बाहुली, पाकिस्तान लवकरच उद्ध्वस्त होणार; तालिबानचं मोठं विधान
Pakistan-Taliban Relations: तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इम्रान खान हे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या (ISI) इशाऱ्यावर नाचणाऱ्या बाहुलीसारखे आहेत, असं विधान तालिबानी नेत्यानं केलं आहे. "इम्रान खान सरकार इस्लामिक अमिरातच्या विरोधात राष्ट्रवादी अफगाणी नागरिकांना भडकवण्याचं काम करत आहे. हे त्यांच्या उद्दीष्टांपैकी एक आहे. लवकरच पाकिस्तान उद्ध्वस्त होईल आणि ते FATF च्या काळ्यात यादीत सामाविष्ट होतील, असं तालिबानचा एक प्रवक्ता म्हणाला.
पाकिस्तान आणि तालिबानमध्ये सध्या विस्तव जात नसल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात दोन्ही देशांमध्ये मैत्रिपूर्ण वातावरण असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता तसं वातावरण राहिलेलं नाही. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) मोईद युसूफ यांनी नुकतंच अफगाणिस्तानसोबतचा ताणलेले संबंध लक्षात घेता प्रस्तावित अफगाणिस्तानचा दौरा देखील रद्द केला आहे.
NRF चा अजूनही संघर्ष सुरूच
तालिबानला अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेऊन आता पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण नॅशनल रेजिस्टेंन्स फोर्स (NRF) अजूनही तालिबान्यांचा प्रतिकार करत आहे. NRF चा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात NRF तालिबान्यांना हाणून पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. तसंच अफगाणिस्तानच्या नागरिकांनी शांत बसू नये. अन्यायाविरोधात आवाज उठवावा असं आवाहन व्हिडिओतून केलं आहे. तसंच आमचा संघर्ष कोणत्याही एका विशिष्ट समहू किंवा जाती विरोधात नसून संपूर्ण अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याची आमची लढाई सुरू आहे, असं NRF चे नेते अहमद मसूद यांनी म्हटलं आहे.