शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:04 IST

NASA Moon Stone Romance Story: अनेकदा तुम्ही चित्रपटांत पाहिले असेल किंवा स्वत: देखील पार्टनरला म्हटले असेल एक दिवस मी तुला चंद्रावर नेईन, चंद्राला आणून देईन, हे काही खरे नसले तरी तो एक प्रेमलाप किंवा श्रृंगाराचा भाग आहे. पण तो पठ्ठ्याने प्रत्यक्षात आणला...

प्रेमात आणाभाका देताना अनेकदा तुम्ही चित्रपटांत पाहिले असेल किंवा स्वत: देखील पार्टनरला म्हटले असेल एक दिवस मी तुला चंद्रावर नेईन, चंद्राला आणून देईन, हे काही खरे नसले तरी तो एक प्रेमलाप किंवा श्रृंगाराचा भाग आहे. परंतू, नासामध्ये लागलेल्या एका इंटर्नने असे काही डोके लावले की त्याने हे अशक्य असलेले आश्वासन पूर्ण केले आहे. 

रॉबर्ट थाड याने नासाच्या यानाने संशोधनासाठी चंद्रावरून आणलेल्या दगड, मातीपैकी काही दगड चक्क चोरले आणि घरी बेडखाली ठेवत त्यावर गर्लफ्रेंडसोबत रोमान्स केला आहे. ला टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या प्रेमवीराने हा किस्सा सांगितला आहे. या दगडाची किंमत २१ दशलक्ष डॉलर एवढी प्रचंड होती. 

विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याची गर्लफ्रेंड देखील नासामध्येच काम करत होती. ही बोलली जात असलेली प्रेमाची गोष्ट या दोघांनी चंद्रावर जाता येत नसले तरी चंद्राच्या दगडाला बेडखाली ठेवून प्रत्यक्षात आणली. रिलेशन अधिक रोमँटीक बनविण्यासाठी रॉबर्टला ही आयडिया सुचली होती. त्याची गर्लफ्रेंड टिफनी फाउलरने देखील त्याला यासाठी मदत केली. या प्रकारावर रॉबर्ट म्हणतो की यापेक्षा चांगले काहीही असू शकत नव्हते. कारण ते चंद्रावर रोमान्स करण्यासारखे होते.

नासातून दगड चोरण्यासाठी काय काय उद्योग केले...यासाठी रॉबर्टला त्याच्या सहकाऱ्यांचीही साथ मिळाली. या सर्वांनी मिळून नासाचे सिक्युरिटी कॅमेरे रिडिझाईन केले. नियोप्रीन बॉडीसूट घातले आणि हे चंद्राचे दगड ठेवलेल्या लॅबपर्यंत पोहोचण्यासाठी ऑफिशियल बॅज देखील तयार केले. रॉबर्ट, फाउलर आणि त्यांच्या एका मित्राने मिळून १७ पाऊंट वजनाचा एक दगड चोरलाच. ही घटना होती २००२ ची. परंतू, एवढे केल्यानंतरही हे लोक पकडले गेले. एफबीआयने हा आर्थिक गुन्हा मानला. या लोकांनी पैशासाठी हे केल्याचा ठपका ठेवण्यात आला. बेल्जिअमच्या एका खरेदीदाराच्या हे लोक संपर्कात होते, तो या दगडांसाठी १ ते ५ हजार डॉलर देण्यास तयार होता, असा दावा करण्यात आला. 

या खरेदीदारानेच या लोकांवर संशय आल्याने एफबीआयला माहिती दिली आणि रॉबर्टचे बिंग फुटले. रॉबर्टला या गुन्ह्यासाठी ८ वर्षांची शिक्षा झाली. तर त्याची गर्लफ्रेंड फाउलरला १५० तास समाज सेवा आणि ९००० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला.  

टॅग्स :NASAनासाrelationshipरिलेशनशिप