शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सिरिया शांततेचा मार्ग सुकर

By admin | Updated: December 20, 2015 00:03 IST

सिरियातील सरकार व विरोधी पक्षांबरोबर चर्चा करून तेथील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी शांतता प्रक्रिया ठरावाला शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एकमताने मंजुरी दिली.

संयुक्त राष्ट्रे : सिरियातील सरकार व विरोधी पक्षांबरोबर चर्चा करून तेथील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी शांतता प्रक्रिया ठरावाला शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एकमताने मंजुरी दिली. तथापि, गुंतागुतीचे विषय विशेषत: अध्यक्ष बशर अल असद यांची काय भूमिका असेल याचा उल्लेख ठरावात नाही. सिरियात संघर्ष सुरू झाल्यापासून सुरक्षा समितीत याबाबतचा हा पहिलाच ठराव आहे. ठरावात म्हटले आहे की, सिरियातील युद्ध संपुष्टात यावे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख बान की मून यांनी पुढील महिन्यात २०१२ च्या जिनिव्हा करारानुसार त्या देशातील सरकार व विरोधी पक्षांची बैठक बोलवावी. जेणेकरून तेथील संघर्षावर तोडगा काढला जाईल. सिरियात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने राजकीय प्रक्रिया सुरू केली जाईल व येत्या सहा महिन्यांत तेथे विश्वासार्ह, वंशभेदरहित, सर्वसमावेशक अशी राजकीय व्यवस्था प्रस्थापित केली जाईल. तसेच नवी राज्यघटना तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. त्यानंतर दीड वर्षाच्या कालावधीत सिरियात संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली निवडणुका होतील. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की, सिरियातील निरपराध लोकांची कत्तल त्वरित थांबली पाहिजे, असा संदेश हे जागतिक व्यासपीठ या ठरावातून देऊ इच्छित आहे. तेथे लोकनियुक्त सरकार स्थापन झाले पाहिजे व त्यासाठी आवश्यक ती राजकीय प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. (वृत्तसंस्था)