स्विस बँक खाती अन् लंडनमध्ये आलिशान महाल; कोण आहे इराणचा नवा सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 09:00 IST2026-03-04T08:59:57+5:302026-03-04T09:00:29+5:30

अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर आता त्यांचा ५६ वर्षीय मुलगा मोजतबा खामेनी याने इराणच्या 'सुप्रीम लीडर'पदाची धुरा हाती घेतली आहे.

Swiss bank accounts and a luxurious palace in London; Who is Iran's new Supreme Leader Mojtaba Khamenei? | स्विस बँक खाती अन् लंडनमध्ये आलिशान महाल; कोण आहे इराणचा नवा सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी?

स्विस बँक खाती अन् लंडनमध्ये आलिशान महाल; कोण आहे इराणचा नवा सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी?

इराणमधील सत्तासंघर्षात आता एका नवीन नावाचा उदय झाला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर आता त्यांचा ५६ वर्षीय मुलगा मोजतबा खामेनी याने इराणच्या 'सुप्रीम लीडर'पदाची धुरा हाती घेतली आहे. मोजतबा केवळ धार्मिक किंवा राजकीय वारसदार नाही, तर तो एका अफाट संपत्तीचा मालक देखील आहे. त्याचे साम्राज्य केवळ इराणपुरते मर्यादित नसून जगातील अनेक प्रगत देशांपर्यंत पसरलेले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

लंडनमध्ये महाल, स्विस बँकेत माया!

मोजतबा खामेनी याच्या अचूक नेट वर्थबद्दल गुप्तता पाळली जात असली, तरी आंतरराष्ट्रीय अहवालानुसार ही रक्कम थक्क करणारी आहे. 'ब्लूमबर्ग'च्या दाव्यानुसार, मुजतबाने पाश्चात्य बाजारपेठांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. लंडनमध्ये १३८ दशलक्ष पाउंड (अंदाजे १५०० कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीची एक आलिशान प्रॉपर्टी मोजतबाच्या मालकीची असल्याचे बोलले जाते. इतकेच नाही तर, स्विस बँक खात्यांवरही त्याची मोठी पकड असून, तिथून त्याचे आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात.

पडद्यामागून हलवतो सत्तेची सूत्रे

विशेष म्हणजे, मोजतबाने आजवर इराणच्या सरकारमध्ये कोणतेही अधिकृत पद भूषवलेले नाही. तो कोणताही उच्च श्रेणीतील धार्मिक नेताही नाही. तरीही इराणच्या राजकारणात आणि लष्करी निर्णयांमध्ये त्याचा शब्द अंतिम मानला जातो. इराण-इराक युद्धादरम्यान त्याने सैन्यातही काम केले आहे. आज इराणच्या शक्तिशाली 'रिव्होल्युशनरी गार्ड कोर'चे त्याला पूर्ण समर्थन आहे, ज्याच्या जोरावर त्याने सुप्रीम लीडरच्या खुर्चीपर्यंत मजल मारली आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वाद

मोजतबाचा विवाह जहरा हदद-अब्देल हिच्याशी २००४ मध्ये झाला होता. जहरा ही इराणच्या संसदेचे माजी अध्यक्ष गुलाम-अली हदेद-अब्देल यांची कन्या आहे. त्यांना तीन मुले असल्याचे सांगितले जाते. मात्र, अलीकडच्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये जहराचा मृत्यू झाल्याचीही चर्चा आहे. इराणच्या कट्टरपंथी परंपरेनुसार मुलाने वडिलांचा उत्तराधिकारी बनणे फारसे पसंत केले जात नाही, मात्र सद्यस्थितीत मोजतबाशिवाय दुसरा प्रभावी पर्याय इराणसमोर नसल्याचे चित्र आहे.

अमेरिकेचे निर्बंध आणि वाढता प्रभाव

मोजतबाच्या वाढत्या वर्चस्वामुळे २०१९ मध्ये अमेरिकेने त्याच्यावर कडक निर्बंध लादले होते. मात्र, या निर्बंधांना न जुमानता त्याने आपले आर्थिक आणि लष्करी साम्राज्य विस्तारले आहे. आता खामेनी कुटुंबातील तो एकमेव जिवंत वारस असल्याचे मानले जात असून, त्याच्या नेतृत्वाखाली इराण आगामी काळात अमेरिका आणि इस्रायलला कसे प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : ईरान का अगला नेता? खामेनेई के बेटे की संपत्ति और उदय

Web Summary : ईरान में उत्तराधिकार की चर्चा के बीच खामेनेई के बेटे मुजतबा का उदय। लंदन संपत्ति और स्विस बैंक खातों सहित विशाल संपत्ति के मालिक, बिना किसी आधिकारिक भूमिका के सत्ता का प्रयोग। रिवोल्यूशनरी गार्ड द्वारा समर्थित, अमेरिकी प्रतिबंधों के बावजूद उनका प्रभाव बढ़ रहा है।

Web Title : Iran's Next Leader? Khamenei's Son, Wealth, and Rise to Power

Web Summary : Mujtaba Khamenei, son of Iran's Supreme Leader, rises amidst succession talks. He owns vast wealth, including London property and Swiss bank accounts, wielding power despite no official role. Backed by Revolutionary Guard, his influence grows despite US sanctions.