Suzuki's big SUV ACross will launch soon in Asian market; Toyota to 'uplift' market | 'मारुती'ची पार्टनर घेऊन येतेय नवी एसयूव्ही; डायरेक्ट टोयोटालाच टक्कर... तुम्ही पाहिलीत का?

'मारुती'ची पार्टनर घेऊन येतेय नवी एसयूव्ही; डायरेक्ट टोयोटालाच टक्कर... तुम्ही पाहिलीत का?

जपानची कार निर्माता कंपनी आणि भारतात मारुतीसोबत भागिदारीत असलेल्या सुझुकीच्या एसयुव्ही सेगमेंटमध्ये दमदार एन्ट्रीची चाहूल लागली आहे. यामुळे एसयुव्हीमध्ये दादा असलेल्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. मारुतीकडे एसयुव्हीमध्ये एकही कार उपलब्ध नाहीय. यामुळे आता ही कार भारतात लाँच झाल्यास मारुतीच्या अन्य कारसारखी ही कारदेखिल विक्रीचे आकडे प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.

 
सुझुकी आणि टोयोटामध्ये प्लॅटफॉर्म वापरण्यासंबंधी करार झाला होता. यानुसार टोयोटा मारुतीची बलेनो ही कार नाव आणि लोगो बदलून विकत आहे. आता Suzuki ACross SUV वरून पडदा उठला असून याच करारातून निर्माण झालेली ही कार आहे. खरेतर Suzuki ACross SUV ही Toyota RAV4 Hybrid चे रिबॅज व्हर्जन आहे. 


ACross ही सुझुकीची आतापर्यंतची सर्वात मोठी एसयुव्ही ठरणार आहे. जी ग्लोबल मार्केटमध्ये व्हिटाराच्या वरच्या श्रेणीत असणार आहे. सुजुकी एक्रॉसचे बॉडी पॅनेलही टोयोटाचे असणार आहेत. काही डिझाईन हे टोयोटाच्या येणाऱ्या Corolla Cross मध्येही असणार आहेत. टोयोटा कोरोला क्रॉस ही परवडणाऱ्या किंमतीतील मिड-साइज एसयूवी आहे. जी पुढील काही महिन्यांत आशियाई बाजारात लाँच केली जाणार आहे. 


सुझुकीच्या या एसयुव्हीमध्ये प्लग-इन हाइब्रिड इंजिन असणार आहे. जे 175bhp ताकद देणार आहे. हे 2.5-लीटर पेट्रोल इंजिन असेल ज्याला दोन इलेक्ट्रीक मोटर देण्यात येतील. एक्रॉसची लांबी 4635mm, रुंदी 1855mm आणि उंची 1690mm असणार आहे. बूट स्पेस 490-लीटर असणार असून पाच सीटर असणार आहे. मागची सीट फोल्ड केल्यास बूट स्पेस 1,604-लीटर होणार आहे. 


 

भारतात लाँच होणार की नाही? 
भारतीय बाजारात मारुती सुझुकीकडे कोणतीही एसयुव्ही नाहीय. मात्र, सध्यातरी एक्रॉस एसयूव्ही भारतात लाँच करण्याची सुझुकीची कोणतीही योजना नाही. कारण टोयोटाची समकक्ष कारही भारतात आलेली नाही. दोन्ही कंपन्या एकत्र येऊन सी-सेगमेंट एमपीव्ही आणि  मिड-साइज एसयूव्हीवर काम करत आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले'

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार

खिंडीत गाठले! भारताने चीनच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले; ड्रॅगनचा श्वास कोंडला

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Suzuki's big SUV ACross will launch soon in Asian market; Toyota to 'uplift' market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.