संशयास्पद! कतारच्या प्रिन्सची एक्स पत्नी कासिया गॅलानियो मृतावस्थेत आढळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:38 IST2022-06-02T19:37:15+5:302022-06-02T19:38:43+5:30
Qatari Princess Kasia Gallanio death case : तिने आरोप केला होता की, आधीच्या पतीने एका अल्पवयीन मुलासोबत अयोग्यरित्या स्पर्श केला होता.

संशयास्पद! कतारच्या प्रिन्सची एक्स पत्नी कासिया गॅलानियो मृतावस्थेत आढळली
कतार : कतारचा प्रिन्स अब्दुल अजीज बिन खलीफा अल थानी (Abdelaziz bin Khalifa Al-Thani) याची एक्स पत्नी कासिया गॅलानियो हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिने आरोप केला होता की, आधीच्या पतीने एका अल्पवयीन मुलासोबत अयोग्यरित्या स्पर्श केला होता.
कतारचे राजकुमार अब्दुल अझीझ बिन खलिफा अल-थानी यांची तिसरी पत्नी कासिया गॅलानियो ही तिच्या स्पेनच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. हे हायप्रोफाईल प्रकरण असल्याने पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
फ्रेंच वृत्तपत्र Le Parisienमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गॅलानियोचा मृत्यू अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे झाला. त्याचवेळी तिच्या संशयास्पद मृत्यूच्या वेळेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गॅलानियो 45 वर्षांची होती, तिच्यावर तिच्या अगोदरच्या पतीकडून मुलांचा ताबा घेण्याचा खटला सुरु होता.
कुटुंबीयांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने बराच वेळ फोन उचलला नाही, तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले. यानंतर पोलिसांचे पथक मार्बेला येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचले. तेव्हा गॅलानियो हिचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, 'प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण अमली पदार्थाचे अतिसेवन असल्याचे दिसते. शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती समोर येईल.