शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

मालदीव संकट : अखेर सर्वोच्च न्यायालयाचे एक पाऊल मागे, राजबंद्यांना मुक्त करण्याचा आदेश रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 11:35 PM

 मालदीवमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटादरम्यान मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

माले -  मालदीवमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटादरम्यान मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येथील सर्वोच्च न्यायालयाने  9 मोठ्या राजकीय कैद्यांना मुक्त करण्याचा आपला आदेश रद्द केला आहे. देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आल्यानंतर एका दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मालदीवच्या सरन्यायाधीशांना याआधीच अटक करण्यात आली असून, त्यांच्या अनुपस्थितीमध्येच हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या कार्यरत असलेल्या अन्य तीन न्यायाधीशांनी सांगितले की, ते 9 राजबंद्यांना मुक्त करण्याचे आदेश रद्द करत आहेत. राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी व्यक्त केलेली चिंता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. राजकीय बंद्यांमध्ये मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशीद यांचाही समावेश आहे.  टदरम्यान, राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर मालदीवचे विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींना अटक करण्यात आली होती. विरोधी पक्ष नेते मौमून अब्दुल गय्युम यांच्यावर लाच घेतल्याचा आणि सरकार पाडण्यासाठी कारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांचे वकिल हमीद यांनी टि्वट करुन ही माहिती दिली. मालदीवमध्ये अब्दुल्ला यामीन सरकार आणि न्यायव्यवस्थेमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याने राजकीय संकट उभे राहिले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानायला नकार दिला आहे. त्यामुळे मालदीवमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता आहे. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतासह अन्य लोकशाही देशांकडे मदत मागितली होती. 

टॅग्स :MaldivesमालदीवCourtन्यायालयPoliticsराजकारण