शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय रजेवर असताना टीव्हीवर लाईव्ह दिसल्याने तुरुंग अधिका-याची आत्महत्या

By admin | Updated: October 9, 2015 18:48 IST

कर्करोगावरील उपचारासाठी वैद्यकीय रजेवर असताना रग्बीचा सामना बघायला गेलेल्या एका महिला तुरुंग अधिका-याला नोकरी गमवावी लागली.

ऑनलाइन लोकमत 

कार्डिफ, दि. ९ - कर्करोगावरील उपचारासाठी वैद्यकीय रजेवर असताना रग्बीचा सामना बघायला गेलेल्या एका महिला तुरुंग अधिका-याला नोकरी गमवावी लागली. या प्रकारामुळे व्यथीत झालेल्या संबंधीत महिला अधिका-याने आत्महत्या केली असून महिलेच्या पालकांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. स्थानिक न्यायालयाने तुरुंग अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई  करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. 
युरोपमधील कार्डिफ तुरुंगात ३४ वर्षीय जॅनेट नॉरिज या महिला तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. महत्वाकांक्षी जॅनेट यांचे तुरुंग प्रमुख व्हायचे स्वप्न होते व यासाठी त्या अथक मेहनतही घ्यायच्या. मात्र २०११ मध्ये त्यांना कर्करोगाने ग्रासले व त्यांना वैद्यकीय रजा घ्यावी लागली. या रजेदरम्यान जॅनेट या मिलेनियम स्टेडियममध्ये रग्बीचा सामना बघायला गेलेल्या. या दरम्यान लाईव्ह टीव्हीवर त्यांची झलक दिसली व हा प्रकार कार्डिफ तुरुंगातील एका कर्मचा-याने बघितला. त्यांनी याविरोधात तुरुंग प्रशासनाकडे तक्रारही केली. तुरुंग प्रशासनाने तातडीने जॅनेट यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तुरुंग प्रमुख होण्याचे स्वप्न भंगल्याने जॅनेट व्यथीत होत्या व यानंतर वर्षभराने त्यांनी आत्महत्या केली.
जॅनेटच्या पालकांनी याविरोधात तुरुंग प्रशासनाला कामगार न्यायालयात खेचले.   जॅनेटच्या पालकांच्या या लढ्याला आता यश आले असून न्यायालयानेही जॅनेटच्या बाजूने निकाल दिला आहे. शिस्तभंगाची कारवाई करतानाच्या प्रक्रियेचा आढावा घेऊन त्याच आवश्यकतेनुसार बदल करा असे कोर्टाने म्हटले आहे.