शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

असा आहे भारत-बांगलादेश भूसीमा समझोता

By admin | Updated: June 7, 2015 01:24 IST

नरेंद्र्र मोदी आणि शेख हसीना वाजेद या दोन पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशांनी शनिवारी ढाक्यात ऐतिहासिक भूसीमा

ढाका : नरेंद्र्र मोदी आणि शेख हसीना वाजेद या दोन पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशांनी शनिवारी ढाक्यात ऐतिहासिक भूसीमा समझोत्यावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे उभय देशांमध्ये गेली ४१ वर्षे प्रलंबित असलेले सीमाविषयक शेवटचे तीन मुद्देही उभयपक्षी सहमतीने निर्णायक स्वरूपात सोडविले गेले आहेत.या समझोत्यामधील प्रमुख मुद्दे असे-१) अनिर्णीत सीमेची हद्दबंदी (डिमार्केशन आॅफ अनमार्कड् लॅण्ड बाऊंडरी)- भारत आणि बांगलादेश यांच्यात ४,०९६.७ किमी लांबीची भूसीमा आहे. यापैकी प. बंगाल, त्रिपुरा व आसाममधील एकूण ६.१ किमी लांबीच्या सीमेची हद्दबंदी व्हायची राहिली होती. ती आता पूर्ण केली जाईल.२) परस्परांच्या ताब्यात असलेल्या भूप्रदेशांचे हस्तांतरण (ट्रान्सफर आॅफ अ‍ॅडव्हर्स ली पझेस्ड एरियाज)- भारताची फाळणी होऊन आधी पूर्व पाकिस्तान व नंतर स्वतंत्र बांगलादेश स्थापन होऊनही दोन्ही देशांमधील काही भूप्रदेशांचा प्रत्यक्ष ताबा गेली इतकी वर्षे दुसऱ्या देशाकडेच राहिला आहे. अशा प्रकारे भारताचे २,७७.०३८ एकरचे भूक्षेत्र बांगलादेशाच्या ताब्यात आहे तर बांगलादेशचा २,२६७.६८२ एकरचा प्रदेश भारताकडे आहे. या जमिनीचे आता औपचारिकपणे ज्या त्या देशाकडे हस्तांतरण केले जाईल.३) अंत:क्षेत्रांचे हस्तांतरण (ट्रान्फर आॅफ एन्क्लेव्हज)- वास्तवात एका देशाचा भाग असूनही दुसऱ्या देशाने पूर्णपणे वेढलेल्या अशा काही वसाहती भारत व बांगलादेशात आहेत. १७,१६०.६३ एकर एवढे क्षेत्र असलेल्या अशा बांगलादेशच्या १११ वसाहती भारताने वेढलेल्या आहेत. त्यांची लोकसंख्या १४,२१५ एवढी आहे. तसेच ७,११०.०२ एकर एवढ्या क्षेत्रफळाच्या भारताच्या ५१ वसाहती बांगलादेशने वेढलेल्या आहेत. या वसाहतींचे आता ज्या त्या देशाकडे औपचारिकपणे हस्तांतरण होईल. म्हणजेच इतकी वर्षे जमिनीवर जे वास्तव होते त्यास आता कायदेशीर स्वरूप दिले गेले आहे. म्हणजेच वसाहती भारताच्या असूनही भारतातून तेथे जाता येत नाही व वसाहती बांगलादेशाच्या असूनही तेथून तेथे जाण्याची सोय नाही, अशी अवस्था होती. परिणामी या वसाहतींमधील भारतीय नागरिक पूर्ण हक्क न मिळता बांगलादेशात व बांगलादेशचे नागरिक पूर्ण हक्क न मिळता भारतात राहत होते. वसाहतींच्या हस्तांतरणाने हा विरोधाभास दूर होईल. (वृत्तसंस्था)