"मी सगळ्यांना प्रार्थना करतो आणि आग्रहाने आवाहन करतो की, ही हिंसा आणि संघर्ष लवकर संपवा", असे विनंती तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी युद्धाच्या मैदानात असलेल्या अमेरिका, इस्रायल, इराण, युक्रेन आणि रशियाला केले आहे. दलाई लामा यांनी सर्वच धर्मांनी दिलेला संदेशाच्या आठवण या देशाच्या नेत्यांना करून दिली आहे.
दलाई लामा यांनी एक्स वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आपण ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, इस्लाम धर्म, हिंदू धर्म, ज्यू धर्म किंवा जगातील कोणतीही महाग आध्यात्मिक पंथ बघितला, तर त्या सगळ्यांचा एकच संदेश आहे की, प्रेम, करुणा, सहनशीलता आणि स्वयं शिस्त."
हे युद्ध लवकर थांबवा कारण, सर्वच धर्मांचा आशय शांतता आणि प्रेम हाच असल्याचे लामा यांनी युद्धात उतरलेल्या देशांना म्हटले आहे.
दलाई लामा यांनी पुढे लिहिले आहे की, "कोणत्याही संघर्षातून कायमचा मार्ग काढायचा असेल, मग तो मध्य पूर्वेतील असो वा रशिया आणि युक्रेन यांच्यातील असो... त्यात संवाद, समजूतदारपणा, एकमेकांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे", असे सांगत त्यांनी हे युद्ध लवकर थांबवण्याचे आवाहन केले आहे.
इस्रायलचे चार जवान ठार
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धात इस्रायलचे चार जवान मारले गेले आहेत. दक्षिण लेबनानमध्ये चार सैनिक ठार झाले आणि दोन जखमी झाले असल्याची माहिती इस्रायलच्या आयडीएफने टेलिग्रामवरील निवेदनात दिली आहे.
जखमी असलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केले गेले असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे आयडीएफने सांगितले. त्याचबरोबर लेबनानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेचे तीन जवानही ठार झाले आहेत.
अमेरिकेचा विमानावर हल्ला
इराणच्या मशहद विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला केला. यात महान एअर या हवाई वाहतूक कंपनीच्या विमानाचे नुकसान झाले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे विमान भारतात जाणार होते. तेथून हे औषधी आणि इतर साहित्य आणून ते लोकांना वाटले जाणार होते. हे विमान याच आठवड्यात नवी दिल्लीला पाठवले जाणार होते. दरम्यान, या हल्ल्याबद्दल मात्र अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
Web Summary : Dalai Lama appeals to world leaders, including Trump and Putin, to end conflicts, emphasizing peace, compassion, and dialogue. He reminds them that all religions promote love and tolerance. Meanwhile, escalating tensions see casualties in Israel and an alleged US airstrike in Iran.
Web Summary : दलाई लामा ने ट्रम्प और पुतिन सहित विश्व नेताओं से शांति, करुणा और संवाद पर जोर देते हुए संघर्षों को समाप्त करने की अपील की। उन्होंने उन्हें याद दिलाया कि सभी धर्म प्रेम और सहिष्णुता को बढ़ावा देते हैं। इस बीच, बढ़ते तनाव के बीच इजरायल में हताहत और ईरान में कथित अमेरिकी हवाई हमले हुए।