शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत भेटीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 11:05 AM

भारतामध्ये मून जाए- इन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतील. मून जाए इन यांची ही पहिलीच भारतभेट आहे.

सेऊल- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इन 8 ते 11 जून असे चार दिवस भारताच्या भेटीवर येत आहेत.भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामधील आर्थिक सहकार्यासंदर्भात विविध विषयांवर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानुसार ते भारतामध्ये येत आहेत.भारतामध्ये मून जाए- इन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतील. मून जाए इन यांची ही पहिलीच भारतभेट आहे.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कामकाज पाहाणाऱ्या ब्लू हाऊसने दिलेल्या माहितीमध्ये, भारत हा केवळ दक्षिण कोरियाचा आर्थिक बाबतीत भागीदार नसून तो कोरियन व्दीपकल्पावर शांतता आणि समृद्धी येण्याच्या कार्यातही महत्त्वाचा सहकारी आहे असे नमूद करण्यात आले आहे.दक्षिण कोरिया आणि भारत या दोन्ही देशांमध्ये 1973 साली अधिकृत संबंधांची स्थापना झाली. भारत भेटीनंतर मून जाए इन 11 ते 13 जूलै सिंगापूरमध्ये असतील. गेल्याच महिन्यामध्ये सिंगापूरमध्ये उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. कोरियन द्वीपकल्पावरील अणूकार्यक्रमाचे उच्चाटन करण्यासाठी त्या दोघांमध्ये एकमत झाले. तत्पुर्वी किम जोंग उन आणि मून जाए इन यांची दक्षिण कोरियाच्या हद्दीमध्ये ऐतिहासिक भेट होऊन चर्चा झाली होती.

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानMoon Jae inमून जे-इनInternationalआंतरराष्ट्रीय