शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Solar Storm: पृथ्वीवर उद्या मोठे संकट! शक्तीशाली सौर वादळ १६ लाख किमी प्रति तास वेगाने झेपावतेय; नासाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 1:43 PM

Solar Storm will hit Earth Sunday or Monday: सौर वादळामुळे पृथ्वीचे बाहेरील वायुमंडळाची उष्णता वाढू शकते. याचा थेट परिणाम सॅटेलाईटवर होण्याची शक्यता आहे. यामुळे जीपीएस नेव्हीगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाईट टीव्हीमध्ये बाधा येऊ शकते. विद्युत भारित तारांमध्ये वीज प्रवाह वाढू शकतो यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील जळू शकतात.

वॉशिंग्टन : सूर्याच्या पृष्ठभागामुळे निर्माण झालेले शक्तीशाली सौर वादळ (Solar strom) तब्बल 16,09,344 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे वादळ उद्या, रविवारी किंवा सोमवारी कोणत्याही क्षणी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. या वादळामुळे सॅटेलाईट सिग्नलांमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. यामुळे विमानांची उड्डाणे, रेडिओ सिग्नल, कम्युनिकेशन आणि हवामानावर मोठा परिणाम होण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. (SOLAR WINDS travelling at speeds of a million miles an hour are expected to batter the planet this weekend and could trigger a geomagnetic storm above Earth.)

स्पेसवेदर डॉट कॉम वेबसाईटनुसार, सूर्याच्या वायुमंडळात या वादळाचा उगम झाला आहे. यामुळे अंतराळातील एका भागावर याचा मोठा प्रभाव दिसणार आहे. यामुळे उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील भागात राहणाऱ्या लोकांना आकाशात सुंदर नजारा पहायला मिळणार आहे. दोन्ही ध्रुवांजवळ रात्रीच्या वेळी आकाशात चमकणारी किरणे दिसतात, त्यांना आरोरा असे म्हणतात. 

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अंदाजानुसार हे वादळ 1609344 किमी प्रति तासाच्या वेगाने पुढे सरकत आहे. याचा वेग कदाचित याहूनही जास्त असू शकतो. जर अंतराळातील महावादळ पृथ्वीवर आले तर अनेक शहरांतील वीज गायब होण्याची शक्यता आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले. सौर वादळामुळे पृथ्वीचे बाहेरील वायुमंडळाची उष्णता वाढू शकते. याचा थेट परिणाम सॅटेलाईटवर होण्याची शक्यता आहे. यामुळे जीपीएस नेव्हीगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाईट टीव्हीमध्ये बाधा येऊ शकते. विद्युत भारित तारांमध्ये वीज प्रवाह वाढू शकतो यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील जळू शकतात. सामान्यपणे अशा वादळांना टक्कर देण्यासाठी पृथ्वीची चुंबकीय शक्ती सुरक्षा कवचाचे काम करते. यामुळे अशी परिस्थिती शक्यता खूप कमी असते. 

१९८९ ची आठवण...१९८९ मध्ये कॅनडाच्या क्युबेक शहरात १२ तासांसाठी वीज गायब झाली होती. यामुळे लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला होता. अशाचप्रकारे १८५९ मध्ये महाशक्तीशाली जिओमॅग्‍नेटिक वादळ आले होते. या वादळाने युरोप आणि अमेरिकेतील दळणवळण यंत्रणा नेस्तनाभूत केली होती. 

टॅग्स :Earthपृथ्वीNASAनासा