शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाची नशा अमली पदार्थांसारखी! बड्या कंपन्यांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 09:58 IST

Social Media Addiction: फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब व टिकटॉक यांसारखी सोशल मीडिया माध्यमे मुलांसाठी ‘अमली पदार्थां’सारखी घातक ठरत असून, या कंपन्या अमेरिकन न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या आहेत.

लॉस एंजिल्स - फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब व टिकटॉक यांसारखी सोशल मीडिया माध्यमे मुलांसाठी ‘अमली पदार्थां’सारखी घातक ठरत असून, या कंपन्या अमेरिकन न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या आहेत. या कंपन्यांविरुद्ध १६०० लोकांनी दाद मागितली असून, मुलांत सोशल मीडियाचे व्यसन वाढविल्याचा आरोप केला आहे. या कंपन्यांनी ॲप्स अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ज्यामुळे मुलांमध्ये त्याचे ‘नशे’सारखे व्यसन लागते. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, असा आरोप करण्यात आला आहे. 

तंबाखू खटल्याशी तुलना  या कायदेशीर लढाईची तुलना १९९० च्या दशकातील प्रसिद्ध ‘तंबाखू खटल्या’शी केली जात आहे, ज्यानंतर सिगारेट कंपन्यांवर जगभर कठोर निर्बंध लादले गेले. या खटल्याचा निकाल जर मुलांच्या बाजूने लागला, तर संपूर्ण सोशल मीडिया उद्योगाची कार्यपद्धती बदलू शकते. यापूर्वी टिकटाॅक आणि स्नॅपचॅटने काही प्रकरणांत न्यायालयाबाहेर तडजोडकेली आहे. 

काय आहेत मुख्य आक्षेप? हा खटला कोणत्याही विशिष्ट पोस्ट किंवा व्हिडीओबद्दल नसून ॲप्स ‘डिझाइन’बद्दल आहे. वकिलांच्या मते, एंडलेस स्क्रोलिंग, अल्गोरिदम आणि सातत्याने येणारे नोटिफिकेशन्स यांसारख्या फीचर्समुळे मुले तासन् तास स्क्रीनला चिकटून राहतात.मुलांच्या मानसशास्त्राचा वापर जाहिरातींमधून नफा वाढीसाठी कंपन्या करतात. 

भविष्यातील प्रकरणांसाठी  मार्गदर्शक खटलायाला ‘बेलवेदर ट्रायल’ किंवा मार्गदर्शक खटला मानले जात आहे, जो भविष्यातील अशा प्रकरणांसाठी एक उदाहरण ठरेल.या प्रकरणाच्या केंद्रस्थानी १९ वर्षीय तरुणी असून, तिला ‘केजीएम’ या नावाने ओळखलेजात आहे.तिचा आरोप आहे की, बालपणातच सोशल मीडियाच्या वापरामुळे तिला त्याचे व्यसन लागले आणि सतत ऑनलाइन राहण्याच्या ओढीमुळे तिला नैराश्य व आत्मघातकी विचारांचा सामना करावा लागला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Social media addiction like drugs; lawsuit against big companies.

Web Summary : Social media giants face lawsuits alleging addictive app designs harm children's mental health. Compared to the tobacco lawsuits, this case could reshape the industry. Features like endless scrolling and notifications are under scrutiny, with a focus on a 19-year-old's struggle with addiction and depression.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाIndiaभारत