शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

त्यामुळे 600 वर्षांनी पृथ्वी बनेल आगीचा गोळा, भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी वर्तवली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 5:33 PM

वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी उर्जेचा वाढलेला बेसुमार वापर यांनी गेल्या काही काळात गंभीर रूप धारण केले आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढलेला उर्जेचा वापर येत्या काळात पृथ्वीचे अस्तिव धोक्यात आणणार आहे.

बीजिंग - वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी उर्जेचा वाढलेला बेसुमार वापर यांनी गेल्या काही काळात गंभीर रूप धारण केले आहे.  वाढती लोकसंख्या आणि वाढलेला उर्जेचा वापर येत्या काळात पृथ्वीचे अस्तिव धोक्यात आणणार आहे.  सातत्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि उर्जेच्या वाढत्या वापरामुळे इ.स. 2600 पर्यंत पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचून तिचे आगीच्या गोळ्यात रूपांतर होईल, अशी भीती महान भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केली आहे. तसेच हा विनाश टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे. हे शक्य नसेल तर मानवाला आणखी काही लाख वर्षे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अन्य ग्रहावार जावे लागेल, असे  मत त्यांनी मांडले. बीजिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी परिषदेला संबोधित करताना हॉकिंग म्हणाले," गेल्या काही काळापासून जगाची लोकसंख्या आणि उर्जेच्या वाढत्या वापरामुळे आम्ही आपल्या पृथ्वीला आगीच्या गोळ्यामध्ये बदलण्याच्या दिशेने नेत आहोत. मोठ्या प्रमाणात उर्जेची निर्मिती होत असल्याने पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. त्याचा फटका मानव जातीला बसणार आहे."दरम्यान, मानवाला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर राहण्यायोग्य अन्य ग्रहाचा शोध घ्यावा लागेल. असा सल्लाही हॉकिंग यांनी दिला."शास्त्रज्ञांनी सौरमालिकेबाहेर अशा एका ग्रहाचा शोध घेतला पाहिजे जिथे ग्रहांचे भ्रमण हे मानवास राहण्यासाठी योग्य असेल. त्यादृष्टीने सेनटॉरी नावाच्या एका ग्रहाचा उल्लेख केला जो मानवी वस्तीसाठी योग्य आहे. पण तो चार लाख प्रकाश वर्षे दूर आहे. त्यामुळे अशा दूर वसलेल्या ग्रहावर जाण्यासाठी शास्त्रज्ञांना एका असे एअरक्राफ्ट बनवावे लागेल जे प्रकाशाच्या वेगाने उड्डाण करेल. आपल्याला एक असे यंत्र बनवावे लागेल जे तासाभरात मंगळावर, एका दिवसात फ्लूटोपर्यंत, एका आठवड्यात वेयेगरपर्यत आणि सेनटॉरीपर्यंत किमान 20 वर्षांत पोहोचेल."  

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञानfireआग