Marriage: ...म्हणून पतीने पत्नीचं लावून दिलं दुसरं लग्न. तिलाही बसला धक्का, मात्र नंतर केलं कौतुक, कारण काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:27 IST2023-03-27T16:26:26+5:302023-03-27T16:27:32+5:30

Marriage: जोडपी आणि रिलेशनशिपमध्ये असे कठीण प्रसंग कधी कधी येतात, त्यामुळे खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात. हल्लीच सोशल मीडियावर एका अशाच प्रकरणाची  चर्चा सुरू होती

...So the husband remarried his wife. She was also shocked, but later appreciated, why? see | Marriage: ...म्हणून पतीने पत्नीचं लावून दिलं दुसरं लग्न. तिलाही बसला धक्का, मात्र नंतर केलं कौतुक, कारण काय? पाहा

Marriage: ...म्हणून पतीने पत्नीचं लावून दिलं दुसरं लग्न. तिलाही बसला धक्का, मात्र नंतर केलं कौतुक, कारण काय? पाहा

जोडपी आणि रिलेशनशिपमध्ये असे कठीण प्रसंग कधी कधी येतात, त्यामुळे खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात. हल्लीच सोशल मीडियावर एका अशाच प्रकरणाची  चर्चा सुरू होती. त्यामध्ये एका अमेरिकन व्यक्तीचा उल्लेख आला. त्याने त्याच्या पत्नीचा विवाह एका व्यक्तीशी करून दिला होता. याचं कारण जेव्हा लोकांना समजलं तेव्हा ते खूप विचारात पडले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना काहीशी जुनी आहे. मात्र हल्ली ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ही घटना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील आहे. काही दिवसांपूर्वी पत्नीनं एक पुस्तक लिहिलं होतं. त्यामध्ये या गोष्टीबाबत गुपित उघड केलं आहे. त्यात तिने तिच्या जीवनामध्ये नवा पती कसा आला याचा याचा उलगडा केला. आहे. हे पुस्तक चर्चेचा विषय ठरले आहे. तसेच हल्ली सोशल मीडियावरही याबाबतची चर्चा झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीला कुठला तरी गंभीर आजार झाला होता. तसेच डॉक्टरांच्या टीमने त्याला तो जास्त दिवस जगणार नाही, असे सांगितले होते. ही गोष्ट जेव्हा त्याने त्याच्या पत्नीला सांगितली, तेव्हा ती दु:खी झाली होती. एकेदिवशी पतीने तिला सांगितले की, तो आता तिच्यासोबत फार दिवस राहू शकत नाही. त्यामुळे तिनं दुसरं लग्न केलं तर चांगलं होईल.

पतीने तिची खूप समजूत घातली. तेव्हा पत्नी दुसरं लग्न करण्यास तयार झाली. त्यानंतर तिच्या जीवनात एका नव्या व्यक्तीचा प्रवेश झाला. काही दिवसांनंतर तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला. आता या महिलेने तिच्या पुस्तकामध्ये तिच्या जीवनातील या रहस्याचा उल्लेख केला आहे. हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. तसेच या महिलेची कहाणी व्हायरल होत आहे. तसेच ही गोष्ट कळल्यावर लोक तिच्या पहिल्या पतीचं कौतुक करत आहेत.  

Web Title: ...So the husband remarried his wife. She was also shocked, but later appreciated, why? see