अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे CEO इलॉन मस्क यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी इलॉन मस्क यांनी, ट्रम्प यांच्या प्रचंड खर्चाच्या कायद्याला पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिकन खासदारांविरुद्ध मोहीम चालविण्यासंदर्भात भाष्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर आता, ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्या टेस्लाला दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करण्याची धमकी दिली आहे.
ट्रम्प म्हणाले, "इलेक्ट्रिक वाहने (EVs) ठीक आहेत. मात्र, ती बळजबरी लोकांवर थोपवणे मुर्खपणाचे आहे. तसेच, आता इलेक्ट्रिक कार तया झाल्या नाही, तर सरकारचा मोठा पैसा वाचेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते" -सोशल मीडियाच्या माध्यमाने ट्रम्प म्हटले, "इतिहासात इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा इलॉन मस्क यांना अधिक सब्सिडी मिळाली आहे. जर सरकारी मदत मिळाली नसती, तर त्यांना दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परतावे लागले असते. स्पेसएक्स आणि टेस्ला सारख्या कंपन्या आता सरकारी खर्चावर भार बनल्या आहेत आणि ना रॉकेट लॉन्च होणार, ना इलेक्ट्रिक वाहने तयार होणार."
DOGE विभागाकडून चौकशीची मागणी -ट्रम्प यांनी अमेरिकन खर्चावर लक्ष ठेवून असलेल्या DOGE (सरकारी खर्च विभाग) विभागाला, मस्क यांच्या कंपन्यांच्या निधीची चौकशी करण्यास सांगितले आहे.
मस्क यांना कशाची चिंता -यासंदर्भात भाष्य करताना मस्क म्हणाले, आपल्याला सब्सिडीची चिंता नाही, तर हे विधेयक भविष्यातील तंत्रज्ञानाला हानी पोहोचवणाऱ्या जुन्या उद्योगांना फायदा देते, याची चिंता आहे. ही "कर्जाची गुलामी" असल्याचे ते म्हणाले.