शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ५ वेळा विमान पाडले

By admin | Updated: July 18, 2014 23:10 IST

युक्रेनच्या हवाई हद्दीत मलेशियन विमान क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

युक्रेनच्या हवाई हद्दीत मलेशियन विमान क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे अशा प्रकारच्या अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आतापर्यंत जगभरात पाच वेळा प्रवासी विमानांना लक्ष्य करून पाडण्यात आले.> ०४ आॅक्टोबर २००१ : सायबेरियन एअरलाईन्सचे एक विमान इस्रायलच्या तेल अवीव येथून रशियाच्या नोवोसिबिर्स्कसाठी रवाना झाले होते. या विमानाला खाली पाडण्यात आले होते. विमान काळ्या समुद्रात कोसळून झालेल्या अपघातात ७८ जण मारले गेले होते. सुरुवातीला युक्रेनच्या सैन्याने या घातपातामागे आपला हात नसल्याची भूमिका घेतली होती; मात्र नंतर युक्रेनने मान्य केले की, सैन्य अभ्यासादरम्यान चुकून विमानाला लक्ष्य करण्यात आले.2 ०३ जुलै १९८८ : इराण एअरलाईन्सचे दुबईला जाणारे एअरबस ए ३०० विमान सौदीच्या हवाई हद्दीत एफ-१४ नामक युद्धविमान समजून पाडण्यात आले होते. १९७९ च्या इराण क्रांतीपूर्वी हे युद्धविमान इराणला विकण्यात आले होते. अमेरिकी युद्धजहाजाने इराणच्या या विमानावर दोन क्षेपणास्त्रे डागल्याने त्यातील सर्व २९० प्रवासी मारले गेले. > ०१ सप्टेंबर १९८३ : न्यूयॉर्कहून सोलकडे जाणारे कोरियन एअरलाईन्सचे प्रवासी विमान तत्कालीन सोव्हिएत संघाने एका युद्धविमानाद्वारे पाडले होते. यातील सर्व २६९ प्रवासी मृत्युमुखी पडले. या विमानाने आपला मार्ग बदलून ते सोव्हिएत हद्दीत घुसले होते. सुरुवातील सोव्हिएत संघाने या घटनेमागे आपला हात नसल्याचा दावा केला होता; मात्र नंतर हे विमान हेरगिरी करीत असल्याचा दावा करीत यामागे आपला हात असल्याचे मान्य केले.> २१ फेब्रुवारी १९७३ : इस्रायलच्या युद्धविमानांनी लिबियन एअरलाईन्सचे बोर्इंग ७२७-२०० विमान इजिप्तच्या सिनाई भागात पाडले होते. खराब हवामान आणि दिशादर्शकात बिघाड झाल्याने पायलटचा मार्ग चुकून हे विमान इस्रायलच्या हवाई हद्दीत भरकटले होते. यात १३ जण दगावले होते, तर ५ जण बचावले.> २३ जुलै १९५४ : कॅथे पॅसिफिक एअरवेजचे सी-५४ स्काईमास्टर विमान बँकॉकहून हाँगकाँगला रवाना झाले होते. हैनान बंदराच्या किनारी भागात चिनी युद्धविमानांनी यास लक्ष्य केले होते. लष्करी कारवाईविरोधात आलेले सैन्य विमान समजून हा हल्ला केल्याचा चीनने दावा केला होता.