शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

ऐकावं ते नवलंच! सौदी अरेबियात पहिल्यांदाच पडला बर्फ, दृष्य पाहून स्थानिकांना बसला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 16:28 IST

सौदी अरेबियातील वाळवंटी प्रदेशात चक्क बर्फवृष्टी झाली आहे.

Snowfall in Saudi Arabia : पृथ्वीच्या वातावरणात गेल्या काही काळापासून अनैसर्गिक बदल पाहायला मिळत आहेत. यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. आता ताजे उदाहरण सौदी अरेबियातून समोर आले आहे. सौदी अरेबियातील वाळवंटी प्रदेशात पहिल्यांदाच चक्क मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव झाला आहे. अल-जौफ प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे स्थानिकांसह तज्ञांनाही चकीत केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अल-जौफ भागातील लोक नेहमीप्रमाणे सकाळी उठले, पण समोर बर्फाची चादर पसरलेली पाहून त्यांना आश्चर्ययाचा धक्का बसला. सौदी प्रेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, येथे फक्त हिमवर्षाव झाला नाही, तर अनेक ठिकाणी धबधबेदेखील तयार झाले आहेत. यामुळे या परिसरातील अनेक खोऱ्यांचे पुनरुज्जीवन झाले असून, संपूर्ण परिसरात गारवा पसरला आहे. 

येत्या काही दिवसात हवामान खराब होणार आहेमात्र, सौदीच्या हवामान खात्याने येत्या काही दिवसांत खराब हवामान कायम राहण्याचा इशारा दिला आहे. अल-जौफमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, पुढील मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे दृश्यमानताही कमी होऊ शकते. या वादळासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यापूर्वी अशी घटना घडलेली असामान्य हवामानाचा अनुभव घेणारा सौदी अरेबिया हा एकमेव देश नाही. याआधी संयुक्त अरब अमिराती (UAE) देखील अशाच प्रकारच्या हवामान बदलातून गेला आहे. 14 ऑक्टोबर रोजी संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने (NCM) अनेक भागात अपेक्षित पाऊस, वादळ आणि गारपिटीच्या शक्यतेबाबत इशारा जारी केला होता. UAE हवामान खात्याने या बदलांचे कारण अरबी समुद्रापासून ओमानच्या दिशेने पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला दिले, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशातील हवामानावर परिणाम झाला.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाSnowfallबर्फवृष्टीInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके