कॅलिफोर्निया/लंडन : नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे आढळले की एखाद्या व्यक्तीची झोप त्याच्या मेंदूचे ‘खरे वय’ सांगू शकते. यामुळे भविष्यात विसरभोळेपणाचा गंभीर आजार म्हणजेच ‘डिमेंशिया’चा धोका वेळीच ओळखून तो टाळणे शक्य होणार आहे.
मेंदूचे वय आणि झोपेचा संबंध हे संशोधन कॅलिफोर्निया विद्यापीठ (सॅन फ्रान्सिस्को) आणि बेथ इस्रायल डिकनेस मेडिकल सेंटर यांनी संयुक्तपणे केले आहे. सुमारे ७,००० लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात ईईजीच्या माध्यमातून मेंदूच्या लहरी रेकॉर्ड करण्यात आल्या. त्यानंतर मशीन लर्निंग मॉडेलच्या साहाय्याने संबंधिताच्या मेंदूच्या वयाचा अंदाज लावण्यात आला.
भविष्यात घरबसल्या तपासणी शक्य होईल. शास्त्रज्ञांच्या मते, भविष्यात अशा उपकरणांचा वापर वाढेल. लोक घरबसल्या आपल्या मेंदूचे वय ठरवू शकतील. यामुळे डिमेंशियासारख्या आजाराचे वेळेत निदान होऊन उपचार करणे सोपे होईल.
संशोधनात काय आढळले
जर एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचे वय त्याच्या वास्तविक वयापेक्षा जास्त असेल, तर त्याला डिमेंशिया होण्याचा धोका वाढतो. दर १० वर्षांच्या अंतराने हा धोका ४०%पर्यंत वाढत असल्याचे आढळून आले आहे. अभ्यासात ‘डीप स्लीप डेल्टा वेव्हज’ व ‘स्लीप स्पिंडल्स’ यांसारखे संकेत अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत, कारण त्यांचा थेट संबंध मानवी स्मरणशक्तीशी असतो.
एआय चष्मा : ‘वरदान’
ब्रिटनमध्ये डिमेंशिया रुग्णांसाठी विशेष ‘एआय चष्म्या’ची चाचणी सुरू आहे. हा चष्मा रुग्णांना दैनंदिन कामात मदत करण्यासाठी ‘तिसरा डोळा’ म्हणून काम करेल. हा चष्मा वस्तू ओळखून आवाज व व्हिज्युअल संकेतांद्वारे रुग्णाला माहिती देतो. यात ‘विस्पी’ नावाचा एआय असिस्टंट असून वापरकर्त्याच्या सवयींनुसार तो त्यांना मार्गदर्शन करतो.
Web Summary : Research links sleep patterns to brain age, aiding early dementia detection. Brain age exceeding actual age increases dementia risk. AI glasses are being tested in Britain to assist dementia patients with daily tasks.
Web Summary : शोध से पता चला है कि नींद के पैटर्न से मस्तिष्क की उम्र का पता चलता है, जिससे डिमेंशिया का जल्द पता लगाने में मदद मिलती है। वास्तविक उम्र से अधिक मस्तिष्क की उम्र डिमेंशिया का खतरा बढ़ाती है। ब्रिटेन में एआई चश्मे का परीक्षण डिमेंशिया रोगियों को दैनिक कार्यों में सहायता के लिए किया जा रहा है।