शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:12 IST2026-01-14T16:11:54+5:302026-01-14T16:12:15+5:30
Crime News: ब्रिटनची राजधानी लंडनमधील हाऊंसलो परिसरात एका १५ वर्षीय शीख मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या तरुणीचं अपहरण करून तिला एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवण्यात आलं, त्यानंतर ५ ते ६ जणांनी तिच्यावर अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला, असे सांगण्यात येत आहे.

शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
ब्रिटनची राजधानी लंडनमधील हाऊंसलो परिसरात एका १५ वर्षीय शीख मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या तरुणीचं अपहरण करून तिला एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवण्यात आलं, त्यानंतर ५ ते ६ जणांनी तिच्यावर अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला, असे सांगण्यात येत आहे. तसेच या घटनेमुळे लंडनमधील शीख समाजात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना १२-१३ जानेवारीच्या सुमारास घडली होती. या अल्पवयीन मुलीला फसवण्यात आले आणि नंतर तिचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर या मुलीला एका ३४ वर्षीय पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीच्या फ्लॅटवर कोंडून ठेवण्यात आले. तिथेच या मुलीवर त्या पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीसह त्याच्या सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच शीख समाजामध्ये संतापाची लाट पसरली. १३ जानेवारी रोजी सुमारे २०० ते ३०० शीखांनी आरोपीच्या फ्लॅटबाहेर गोळा होऊन तीव्र आंदोलन केले.
या आंदोलनाचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये आंदोलक घोषणाबाजी करताना आणि पोलीस आरोपीच्या घराच्या संरक्षणासाठी उभे आहेत, असं चित्र दिसलं. त्यामुळे आंदोलक शीख अधिकच भडकले. आंदोलक अनेक तास तिथे उभे होते. तसेच या मुलीची सुटका करण्याची मागणी करत होते. आम्ही पोलिसांना याची माहिती दिली होती. मात्र त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. शेवटी आंदोलकांनी स्वत: पुढाकार घेऊन या तरुणीला सोडवले, असा दावा आंदोलकांनी केली.
सदर मुलगी आता सुरक्षित आहे. मात्र या घटनेमुळे शीख समूदायामध्ये संतापाचं वातावरण दिसत आहे. या समूदायातील लोकांनी हे प्रकरण ग्रूमिंग गँगसी संबंधित असल्याचा आरोप केला. दरम्यान, ब्रिटनमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तसेच हे आरोपी मुख्यत्वेकरून पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे.