'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:56 IST2025-06-26T12:54:06+5:302025-06-26T12:56:12+5:30
Shubhanshu Shukla's First Message From Space: भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी ड्रॅग्म कॅप्सूलमधून अंतराळ स्थानकाकडे जातानाचा त्यांचा अनुभव शेअर केला.

'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
Shubhanshu Shukla Space Video: भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी काल आपल्या टीमसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) उड्डाण घेतली. त्यांचे यान वेगाने ISS कडे झेपावत आहे. दरम्यान, अॅक्सिओम स्पेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये शुभांशू यांनी त्यांच्या अंतराळ प्रवासाच्या रोमांचक अनुभवाचे वर्णन केले.
#WATCH | #AxiomMission4 का संचालन कर रहे भारतीयअंतरिक्ष यात्री ग्रुप कैप्टन सुभांशु ने अंतरिक्ष में अपनी यात्रा के बारे में जानकारी देते हुए कहा, "अंतरिक्ष से नमस्कार! मैं अपने साथी अंतरिक्ष यात्रियों के साथ यहां आकर रोमांचित हूं।"
— ANI_HindiNews (@AHindinews) June 26, 2025
एक खिलौना हंस को लेकर उन्होंने कहा कि भारतीय… pic.twitter.com/JiChRCgrcQ
व्हिडिओमध्ये शुभांशू म्हणतात, 'नमस्कार फ्रॉम स्पेस. मला खूप अभिमान वाटतोय. माझ्या खांद्यावरचा तिरंगा सांगत होता की, सर्व देशवासी माझ्यासोबत आहेत. भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणासाठी हे एक मोठे पाऊल आहे. अंतराळ प्रवास हा माझ्यासाठी स्वप्नासारखा अनुभव आहे. प्रक्षेपणानंतर जेव्हा मी पृथ्वी पाहिली, तेव्हा असे वाटले की, जणू एखाद्या चित्रकाराने निळे आणि हिरवे रंग मिसळून कॅनव्हास बनवला आहे. ड्रॅगन अंतराळयान प्रक्षेपणानंतर १० मिनिटांनी रॉकेटपासून वेगळे झाले, तेव्हा मला खिडकीतून सूर्याची चमक आणि तारे दिसले. माझ्यासाठी ते अविश्वसनीय होते. हा माझा प्रवास नाही, तर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. माझ्याद्वारे तुम्हीही या प्रवासाचा पुरेपूर आनंद घ्या.'
मोहिमेत कुणाचा समावेश?
दरम्यान, अॅक्सिओम-4 मोहिमेत शुभांशू यांचा पायलट म्हणून समावेश आहे. त्यांच्यासोबत क्रूमध्ये कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोश उजनांस्की-विश्निव्स्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) यांचा समावेश आहे.
सध्याची स्थिती
हे ड्रॅगन यान 28,000 किमी/तास वेगाने 418 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे. यान सध्या ISS पासून ४०० मीटर अंतरावर असून, भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता डॉकिंगसाठी सज्ज आहे.