शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

IS च्या दहशतवाद्यांचा छळ करायला हवा, त्यांच्या बायका-मुलांना ठार मारायला हवं - डोनाल्ड ट्रम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 13:51 IST

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना पकडून महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा क्रूर छळ करायला हवा, तसेच त्यांच्या बायका-मुलांना ठार मारायला हवे, असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 7 - इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना पकडून महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा क्रूर छळ करायला हवा, तसेच त्यांच्या बायका-मुलांना ठार मारायला हवे, असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे. रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या स्पर्धेत सध्या आघाडीवर असलेल्या ट्रम्प यांनी मी जर अमेरिकेचा अध्यक्ष झालो तर हे करीन असं म्हटलंय.
इस्लामिक स्टेटसाठी कुठलेही नियम नाहीत, ते त्यांना हवं तसं वागू शकतात आणि आपण मात्र अनेक नियमांनी जखडलेलो असल्यामुळे आपलं नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. दहशतवाद्यांचा नायनाट करायचा असेल तर त्यांच्याशी तितक्याच क्रूरपणे वागायला हवं असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे थर्ड डिग्री म्हणतो त्याप्रमाणे कैद्यांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती काढण्याची पद्धत अमेरिकेत होती. मात्र, ओबामा यांनी ती 2009 मध्ये बंद करून दहशतवाद्यांनाही मानवतावादी वागणूक देण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही, तर दहशतवाद्यांच्या बायका-मुलांनाही ठार मारायला हवं असं ते एका मुलाखतीत म्हणाले.
"दहशतवादी जसे हा खेळ खेळतात, आपल्यालाही तो तसाच खेळायला हवा. आपण सौम्यपणे वागतो, तर त्यांच्या क्रूरपणाला कसलंही मर्यादा नाही. आपल्या या दुर्बल मानसिकतेमुळे आपण इस्लामिक स्टेटचा परबाव करू शकलेलो नाही." असं ट्रम्प म्हणाले. अर्थात, नंतर प्रसिद्धीपत्रक काढून आपण अध्यक्ष झालो तरी, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करू आणि अमेरिकी लष्कराला कायद्यापलीकडे जाऊन वागण्याचा आदेश देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.