शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पॅरिसमध्ये ऑलिम्पिकला सुरुवात होण्यापूर्वी महिलेवर ५ जणांनी केला सामुहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 23:02 IST

France Crime News: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र ऑलिम्पिकला सुरुवात होण्यापूर्वी पॅरिसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका २५ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिलेवर कथितपणे ५ जणांनी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र ऑलिम्पिकला सुरुवात होण्यापूर्वी पॅरिसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका २५ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिलेवर कथितपणे ५ जणांनी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. समोर येत असलेल्या वृत्तानुसार ही घटना १९ जुलै रोजी मध्यरात्री घडली होती. 

या घटनेशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये पीडित महिला या घटनेनंतर एका दुकानामध्ये जाऊन मदत मागताना दिसत आहे. त्यामध्ये तिचे कपडे फाटलेले दिसत आहेत. तसेच ती मदतीसाठी विनवणी करत आहे. तर दुकानातील कर्मचारी आणि ग्राहक तिला दिलासा देताना दिसत आहेत.  त्याचदरम्यान एक व्यक्ती दुकानात आली. तेव्हा महिलेने तो हल्लेखोरांपैकी एक असल्याचा दावा केला. तेव्हा त्याने या महिलेवर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानातील इतर लोकांनी विरोध केल्याने तो पळून गेला. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पीडित महिला ही फिरत होती, तसेच तिने थोडं मद्यपानही केलेलं होतं. तेवढ्यात तिला पाच जणांनी घेरलं. हे पाचही जण आफ्रिकन वंशाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पीडित महिलेला फ्रान्समधील ऑस्ट्रेलियन दुतावासाच्या माध्यमातून मदत देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ऑस्ट्रेलियन दुतावासाकडून सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, पॅरिसमधील सरकारी वकिलांच्या कार्यालयाने सांगितले की, पोलीस २५ वर्षांच्या ऑस्ट्रेलियन महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपाचा तपास करत आहेत. मागच्या आठवड्याच्या अखेरीस ही घटना घडली होती. दरम्यान, शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.  

टॅग्स :Franceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीय