‘जीपीएस’ प्रणालीवर हल्ले झाल्याने मंदावली आखातातील जहाज वाहतूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 06:58 IST2026-03-15T06:57:04+5:302026-03-15T06:58:26+5:30

जीपीएस प्रणाली पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांकडून मिळणाऱ्या सिग्नलच्या मदतीने जहाजाचे अचूक स्थान ठरवते.

Ship traffic in the Gulf slowed down due to attacks on GPS systems | ‘जीपीएस’ प्रणालीवर हल्ले झाल्याने मंदावली आखातातील जहाज वाहतूक 

‘जीपीएस’ प्रणालीवर हल्ले झाल्याने मंदावली आखातातील जहाज वाहतूक 

जॉर्जिया : इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे हवाई हल्ले व लष्करी हालचालींच्या बातम्या चर्चेत असल्या तरी या संघर्षाने समुद्रातील मालवाहू जहाजांच्या सुरक्षिततेशी संबंधित एक गंभीर धोका समोर आला आहे. 

आधुनिक माल जहाज वाहतूक मोठ्या प्रमाणावर जीपीएस उपग्रह नेव्हिगेशनवर अवलंबून असते. मात्र, जीपीएस सिग्नलमध्ये अडथळे निर्माण झाले किंवा त्यात फेरफार झाला, तर जहाजांची प्रत्यक्ष स्थिती व नेव्हिगेशन प्रणालीवर दिसणारे स्थान यात फरक निर्माण होतो. त्यामुळे जहाजे चुकीच्या दिशेने जाऊ शकतात किंवा इतर जहाजांशी टक्कर होण्याची भीती असते. अशा प्रकारच्या डिजिटल हस्तक्षेपाने समुद्री वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढत आहे.

जीपीएस ‘जॅमिंग’ आणि ‘स्पूफिंग’ म्हणजे काय?
जीपीएस प्रणाली पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांकडून मिळणाऱ्या सिग्नलच्या मदतीने जहाजाचे अचूक स्थान ठरवते.

‘जॅमिंग’मध्ये हल्लेखोर कृत्रिम विद्युतचुंबकीय लहरी निर्माण करून उपग्रहांकडून येणारे खरे सिग्नल दडपून टाकतात. त्यामुळे नेव्हिगेशन प्रणालीला योग्य सिग्नल मिळत नाहीत आणि जहाजाची दिशा ठरवणे कठीण होते.

‘स्पूफिंग’मध्ये बनावट संकेत पाठवून जहाजाचा मार्ग चुकवला जातो. जहाज प्रत्यक्षात एका ठिकाणी असते, पण नेव्हिगेशन प्रणालीवर ते पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असल्याचे दिसते.

१,१००+ जहाजे : जीपीएस सिग्नलमधील अडथळ्यांमुळे आखातात १,१०० पेक्षा अधिक जहाजांच्या नेव्हिगेशनवर परिणाम. २ सायबर हल्ले : जीपीएस ‘जॅमिंग’ आणि ‘स्पूफिंग’. मार्ग बदलणारी जहाजे : नेव्हिगेशन गोंधळामुळे काही जहाजांनी मार्ग बदलला. जहाजांना अपघाताचा धोका : जीपीएसचे सिग्नल चुकीचे गेल्यास जहाजांच्या टक्करीचा धोका वाढतो.

अपघाताचा धोका वाढतो -
जीपीएसमध्ये बिघाड झाल्यास समुद्रात जहाजाचे अचूक स्थान ओळखणे कठीण होते. मे २०२५ मध्ये लाल समुद्रातून जात असताना ‘एमएससी अँटोनिया’ या कंटेनर जहाजाच्या नेव्हिगेशन प्रणालीवर चुकीचे स्थान दिसू लागले. त्यामुळे जहाज किनाऱ्याला धडकले व मोठे नुकसान झाले. 

होर्मुझमधील परिस्थिती -
इराणमधीलयुद्धामुळे अनेक व्यापारी जहाजांच्या नेव्हिगेशन प्रणालींमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. काही जहाजांच्या प्रणालींवर त्यांचे स्थान विमानतळ किंवा जमिनीवरील ठिकाणी असल्याचेही दिसले. शिपिंग विश्लेषण कंपनी 'विंडवर्ड'च्या माहितीनुसार, १,१०० पेक्षा अधिक व्यापारी जहाजांच्या नेव्हिगेशन प्रणालींवर हल्ले झाले आहेत.

यामुळे काही जहाजांना मार्ग बदलावा लागला तर काही जहाजांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपली स्वयंचलित ओळख प्रणाली (एआयए) बंद करून प्रवास केल्याचेही आढळले. होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांची हालचालही काही प्रमाणात मंदावली आहे.

Web Title : अमेरिका-ईरान तनाव के बीच जीपीएस हमलों से खाड़ी जहाजरानी धीमी

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के कारण जीपीएस हस्तक्षेप से खाड़ी जहाजरानी प्रभावित। जैमिंग और स्पूफिंग नेविगेशन को बाधित करते हैं, जिससे जहाजों को खतरा है। 1,100 से अधिक जहाज प्रभावित, मार्ग बदलने और होर्मुज के पास यातायात धीमा।

Web Title : GPS Attacks Slow Gulf Shipping Amidst US-Iran Tensions

Web Summary : GPS interference impacts Gulf shipping due to US-Iran tensions. Jamming and spoofing disrupt navigation, endangering vessels. Over 1,100 ships affected, forcing route changes and slowing traffic near Hormuz.