पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची लाजिरवाणी अवस्था, फेक बातम्यांचा हवाला देत लष्कराचे कौतुक केले; पाक माध्यमांनीच सत्य उघड केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:33 IST2025-05-16T11:33:10+5:302025-05-16T11:33:57+5:30
'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानची अवस्था लाजिरवाणी झाली आहे. आता परराष्ट्र मंत्र्यांनी फेक बातमीचा हवाला देत नवीन दावा केला आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची लाजिरवाणी अवस्था, फेक बातम्यांचा हवाला देत लष्कराचे कौतुक केले; पाक माध्यमांनीच सत्य उघड केले
भारत-पाकिस्तानमधील वाद आता निवळला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. युद्धविरामनंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी वेगवेगळे दावे केले होते. आता त्यांनी फेक बातमीचा हवाला देत वेगळाच दावा केला आहे. हा दावा पाकिस्तानी माध्यमांनी उघड केला आहे. यामुळे आता दार यांची अवस्था लाजिरवाणी झाली आहे.
भारताविरुद्ध पाकिस्तानी सैन्याचे कौतुक करण्यासाठी, इशाक दार यांनी फेक बातमीचा हवाला दिला.हा दावा त्यांच्या देशाच्या माध्यमांनी उघड केला.
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
संसदेत भाषणादरम्यान, इशाक दार यांनी यूकेस्थित 'द डेली टेलिग्राफ'च्या फेक पेजवर असलेल्या बातम्यांचा हवाला देत पाकिस्तानी सैन्याचे कौतुक केले. पण नंतर, पाकिस्तानी वाहिनी 'द डॉन'ने त्यांच्या फॅक्ट चेकमध्ये म्हटले की, इशाक दार यांनी 'द डेली टेलिग्राफ'च्या बातमीचा हवाला दिला. ते चॅनेल फेक आहे.
इशाक दार यांनी संसदेत भाषणावेळी या बातमीचा संदर्भ दिला. इशाक दार म्हणाले की, "टेलीग्राफ लिहितो की पाकिस्तानी हवाई दल संपूर्ण आकाशावर राज्य करते." खरं तर त्यांनी ज्या बातमीचा संदर्भ दिला ती बातमीचा खोटी आहे.
'द डॉन'ने केले फॅक्ट चेक
पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉनने' या बातमीचे फॅक्ट चेक केले . यामधून ही बातमी खोटी असल्याचे समोर आले. त्यांच्या आहवालामध्ये त्यांनी सांगितले की, युकेच्या 'द डेली टेलीग्राफ'ने पाकिस्तान संदर्भात अशी कोणतीही बातमी छापलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फेक पोस्टमध्ये १० मे चा फोटो असलेला एक रिपोर्ट व्हायरल होत आहे. यामध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे वर्णन 'King Of The Skies' असे करण्यात आले आहे. ही बातमी 'द डेली टेलिग्राफ'ची असल्याचा दावा या पोस्टमध्ये केला आहे. डॉनने हे दावे फेटाळून लावले आहेत.
Pakistan is now grasping at straws.
Pakistan’s Deputy PM Ishaq Dar lied to the country’s senate that the Telegraph newspaper moved a headline that the PAF was the ‘Undisputed King of the Skies’. So embarrassing that Dawn News had to fact check him. pic.twitter.com/lhrMnpTArM— ishaan prakash (@ishaan_ANI) May 16, 2025