'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:42 IST2025-12-03T14:40:31+5:302025-12-03T14:42:22+5:30
या समृद्धशाली देशांमध्ये पाणी विशेषत: पिण्याचे योग्य पाणी असणारे नैसर्गिक स्त्रोत नाही. या देशात नद्या नाहीत ज्यामुळे या महाशक्तीशाली देशासमोर मोठं आव्हान उभं राहते

'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
जगात असे बरेच देश आहेत जे जागतिक आर्थिक महाशक्ती म्हणून ओळखले जातात. त्या देशांकडे सर्व संसाधने, पैसा, नागरिकांसाठी उच्च राहणीमान, रोजगाराच्या संधी आणि जगातील सर्वात मजबूत चलन या सर्व गोष्टी आहेत. ज्यामुळे अशा देशाला सुपरपॉवर म्हणून मान्यता दिली जाते.
परंतु अशा गोष्टी ज्या मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहेत जसं पाणी...या समृद्धशाली देशांमध्ये पाणी विशेषत: पिण्याचे योग्य पाणी असणारे नैसर्गिक स्त्रोत नाही. या देशात नद्या नाहीत ज्यामुळे या महाशक्तीशाली देशासमोर मोठं आव्हान उभं राहते. या देशाचं नाव आहे कुवैत..मिडिल ईस्टचा असा अरब देश ज्यांच्याकडे कुठलीही नदी वाहत नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. WRI च्या एक्वाडक्ट वॉटर रिस्क एटलसनुसार, कुवैत जगातील सगळ्यात भीषण अशा जलसंकटाचा सामना करणाऱ्या देशांपैकी एक आहे. या देशात पिण्याच्या पाण्यासाठी कृत्रिम पद्धतीवर अवलंबून राहावे लागते. ज्यात समुद्राचे खारे पाणी पिण्याच्या लायकीचे बनवले जाते.
सौदी अरेबिया
सौदी अरेबिया हादेखील मिडिल ईस्टमधील सर्वात ताकदवान आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न देश आहे. परंतु या देशात एकही नदी वाहत नाही. ज्यामुळे इथं पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे. याठिकाणी भूमिगत पाण्याचा वापर केला जातो, मात्र तितका पाणीसाठा देशातील मागणीसाठी पुरेसा नाही. त्यामुळे या देशातही डिसेलिनेशन प्लांट लावण्यात आलेत, जिथे समुद्रातील खारे पाणी पिण्यासाठी बनवले जाते. सौदी अरेबियामध्ये जवळपास ३०-४० डिसेलिनेशन प्लांट उपलब्ध आहेत.
कतार
कतारमध्येही पिण्याच्या पाण्यासाठी डिसेलिनेशन प्लांटवर अवलंबून राहावे लागते. हा जगातील सर्वात श्रीमंत आणि आर्थिक मजबूत देश आहे. परंतु या मुस्लीम देशात पाऊस फार तुरळक असतो. ज्यामुळे इथेही एकही नदी नाही. कतारमध्ये ८ डिसेलिनेशन प्लांट आहे जे दरदिवशी ६९५ मिलियन गॅलन पाणी उत्पादन करते.
बहरीन
WRI च्या आकडेवारीनुसार बहरीन हा देशही जगात पाणी संकटाचा सामना करणाऱ्या देशांच्या यादीत आहे. हा मध्य पूर्वमधील वाळवंटी देश आहे. जिथे पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. बहरीन देशही त्यांच्या पाण्याची मागणी डिसेलिनेशन टेक्नोलॉजीच्या माध्यमातून पूर्ण करतो.
संयुक्त अरब अमीरात(UAE)
हा देश मध्य पूर्वेतील पर्यटनाच्या बाबतीत सर्वाधिक आघाडीवर असणारा देश आहे. परंतु इथेही पाण्याची समस्या जाणवते. मागणी खूप असल्याने डिसॅलिनेशन टेक्नोलॉजीवर अवलंबून राहावे लागते. याठिकाणी क्लाउड सीडिंग, मोठे स्टोरेज आणि ड्रेनेज प्रोजेक्ट सुरू करण्यात आले आहेत.
ओमान
ओमान देशालाही जलसंकटाचा सामना करावा लागतो. याठिकाणी लोक पिण्याच्या पाण्यासाठी भूमिगत जल आणि डिसेलिनेशन तंत्रज्ञानावर निर्भर आहेत. याठिकाणी नद्या आहेत पण त्यात पाणी नाही. जेव्हा पाऊस जास्त होतो तेव्हा अचानक या नद्या आणि तलावे पाण्याने भरतात.
लीबिया
लीबियाजवळ कच्च्या तेलाचा साठा आहे परंतु हा देश अनेक वर्षांपासून जलसंकटाचा सामना करत आहे. याठिकाणी बहुतांश पाणी जमिनीखालून घेतले जाते आणि त्यात सातत्याने घट पाहायला मिळत आहे.