भारतीय लेकीच्या मृत्यूची किंमत २६५ कोटी! अमेरिकेतील 'त्या' प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल; पोलिसांवर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:40 IST2026-02-12T14:39:14+5:302026-02-12T14:40:56+5:30

जाह्नवी कंडुला मृत्यूप्रकरणी २९ दशलक्ष डॉलर्सची भरपाई जाहीर

Seattle Agrees to 29M doller Settlement in Fatal Police Crash Involving Indian Tech Student | भारतीय लेकीच्या मृत्यूची किंमत २६५ कोटी! अमेरिकेतील 'त्या' प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल; पोलिसांवर ठपका

भारतीय लेकीच्या मृत्यूची किंमत २६५ कोटी! अमेरिकेतील 'त्या' प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल; पोलिसांवर ठपका

अमेरिकेतील सीअॅटल शहरात पोलीस वाहनाच्या धडकेत प्राण गमावलेल्या २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी, जान्हवी कंडुला हिच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे. सीअॅटल प्रशासनाने जाह्नवीच्या कुटुंबाला २९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २६५ कोटी रुपये भरपाई देण्याचे मान्य केले आहे. अमेरिकेच्या इतिहासात पोलीस हलगर्जीपणामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांतील हा आजवरचा सर्वात मोठा मोबदला मानला जात आहे.

काय होते प्रकरण?

२०२३ मध्ये सीअॅटलमध्ये रस्ता ओलांडत असताना जाह्नवीला पोलीस अधिकारी केविन डेव्ह यांच्या सुसाट कारने धडक दिली होती. तपासात समोर आले की, ज्या भागात वेगाची मर्यादा ताशी ४० किमी होती, तिथे हा अधिकारी ताशी ११९ किमी वेगाने गाडी चालवत होता. जान्हवी  ही नॉर्दन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. या भीषण अपघातात तिचा दुर्दैवी अंत झाला.

हे प्रकरण केवळ अपघातामुळेच नाही, तर त्यानंतर समोर आलेल्या एका अमानवीय व्हिडिओमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते. अपघातानंतर डॅनियल ऑडरर या दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या बॉडी कॅमेराचे फुटेज समोर आले होते. यात तो जान्हवीच्या मृत्यूवर हसताना आणि तिच्या आयुष्याला मर्यादित मूल्य आहे, तिला फक्त चेक लिहून द्यावा" असे म्हणताना दिसला होता.

भारताचा तीव्र आक्षेप

या निर्घृण वक्तव्यामुळे भारताने राजनैतिक पातळीवर तीव्र निषेध नोंदवला होता. सीअॅटलच्या नागरी संस्थेनेही मान्य केले की, या टिप्पणीमुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळली आणि सार्वजनिक विश्वासाला तडा गेला.

'जान्हवीचे आयुष्य महत्त्वाचे होते'; प्रशासनाची कबुली

बुधवारी या ऐतिहासिक तडजोडीची घोषणा करताना सीअॅटलच्या सिटी अॅटर्नी एरिका इव्हान्स म्हणाल्या की, "जान्हवी कंडुलाचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक होता. या आर्थिक भरपाईमुळे तिच्या कुटुंबाला थोडा दिलासा मिळेल अशी आम्हाला आशा आहे. जान्हवीचे आयुष्य तिच्या कुटुंबासाठी आणि आमच्या समाजासाठी महत्त्वाचे होते."

जान्हवीच्या कुटुंबाला भरपाई म्हणून सुमारे २६५ कोटी रुपये मिळणार आहे. यापैकी सुमारे १८२ कोटी रुपये शहराच्या विम्यातून दिले जातील. किंग काउंटी सुपीरियर कोर्टात या तडजोडीची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.

जान्हवीच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील भारतीय समुदायाने आणि जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी न्यायासाठी मोठा लढा दिला होता. ही विक्रमी भरपाई म्हणजे जान्हवी परत येणार नसली तरी, तिच्या कुटुंबाच्या संघर्षाला मिळालेला हा एक मोठा नैतिक विजय मानला जात आहे.

Web Title : भारतीय छात्रा की मौत: पुलिस लापरवाही पर सिएटल $29 मिलियन देगा।

Web Summary : सिएटल जान्हवी कंडुला के परिवार को $29 मिलियन का भुगतान करेगा, जिसकी मौत तेज गति से आ रही पुलिस कार से हुई थी। यह समझौता एक अधिकारी की उसकी मौत पर असंवेदनशील टिप्पणी के बाद हुआ है, जो न्याय के लिए एक ऐतिहासिक जीत है।

Web Title : Indian student's death: Seattle pays $29M after police negligence.

Web Summary : Seattle will pay $29 million to the family of Janhvi Kandula, an Indian student killed by a speeding police car. The settlement follows outrage over an officer's callous remarks about her death, marking a historic victory for justice.