शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
6
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
7
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
8
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
9
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
10
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
11
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
12
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
13
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
14
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
15
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
16
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
17
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
18
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
19
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
20
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राचे पाणी होतेय ‘विषारी’ : समुद्री जीवसृष्टी धोक्यात, तुमच्या प्लेटमधील मासे गायब होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 11:39 IST

हा बदल जगभरातील सागरी जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे.

स्कॉटलंड : स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज येथील एका नवीन संशोधनाने गंभीर इशारा दिला आहे की, जगातील अनेक किनारी भाग पूर्वीच्या अंदाजे वेगापेक्षा अधिक जलद गतीने आम्लधर्मी (ॲसिडिक) होत आहेत. ‘नेचर कम्युनिकेशन्स’मधील प्रकाशित अभ्यासानुसार, कॅलिफोर्निया करंटसारख्या ‘अपवेलिंग’ क्षेत्रांमध्ये ही प्रक्रिया,  वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या वाढीमुळे होणाऱ्या सामान्य ॲसिडिफिकेशनपेक्षा  वेगवान आहे.  यामुळे  जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे.

२०व्या शतकापासून पीएचमध्ये घट : संशोधकांनी २०व्या शतकातील कोरल नमुन्यांचा बोरोन आइसोटोप वापरून अभ्यास केला. या अभ्यासात  किनाऱ्यावरील पाण्याच्या पीएच पातळीत मागील सतत घट झाली आहे असून २१व्या शतकात ही घट आणखी वेगाने होण्याची चिन्हे आहेत. हा बदल जगभरातील सागरी जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे.

मत्स्यपालनाला मोठा धोका

‘अपवेलिंग’ प्रणाली हे पृथ्वीवरील सर्वाधिक मासेमारी उत्पादन देणारे क्षेत्र मानले जातात; परंतु जेव्हा हे खोल व आम्लधर्मी पाणी वारंवार पृष्ठभागावर येते व  कार्बन डायऑक्साइडच्या संपर्कात येते. सीओ२ मुळे पाणी ॲसिडिक होते.   तेव्हा मासे, कोळंबी, शिंपले आणि प्रवाळ यांसारखे समुद्री जीव वेगाने नष्ट होऊ लागतात.

पाणी ॲसिडिक होण्याची मुख्य कारणे काय आहेत?

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड समुद्राच्या पाण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विरघळत आहे, ज्यामुळे पाण्याचा पीएच सतत कमी होत आहे.

‘अपवेलिंग’ प्रणाली : या प्रक्रियेमुळे समुद्राच्या खोल भागातील पाणी पृष्ठभागावर येते. परंतु सध्या ते अधिक आम्लधर्मी बनले आहे. हे आम्लधर्मी पाणी पृष्ठभागावर येताच हवेतील कार्बन डायऑक्साइडच्या संपर्कात येते आणि त्यामुळे ते अनेक पटीने अधिक आम्लधर्मी बनते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ocean acidification threatens marine life, fish disappear from your plate.

Web Summary : Ocean acidification, accelerated by carbon dioxide, endangers marine ecosystems globally. Studies reveal rapidly declining pH levels in coastal waters, threatening fisheries and economies dependent on marine life. Upwelling systems exacerbate the problem, harming fish, shellfish, and coral.