मोठी घडामोड! चीनच्या समुद्रात पोहोचलेला रशियन तेलाचा टँकर अचानक भारताकडे वळला; अनेकांच्या भुवया उंचावल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:14 IST2026-03-18T14:13:03+5:302026-03-18T14:14:55+5:30
Russian Oil Tanker U-Turn: रशियाचा चीनला 'खो'! मधल्या समुद्रातून फिरवले तेलाचे जहाज, आता भारताची होणार चांदी

मोठी घडामोड! चीनच्या समुद्रात पोहोचलेला रशियन तेलाचा टँकर अचानक भारताकडे वळला; अनेकांच्या भुवया उंचावल्या...
मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय ध्वज असलेले 'जग लाडकी' हे तेलवाहू जहाज गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर होर्मुझ खाडी पार करून पोहोचलेले असतानाचा दक्षिण चीन समुद्रात खळबळजनक घटना घडली आहे. रशियाहून कच्चे तेल घेऊन जाणारा टँकर अचानक भारताच्या दिशेने वळला आहे.
लारीजानींवर हल्ला करून ट्रम्पनी महत्वाचा मोहरा गमावला; युद्ध थांबवणे आता अशक्यप्राय; तज्ज्ञांनी वर्तवला धोक्याचा इशारा
कच्च्या तेलासाठी आता स्पर्धा तीव्र झाली आहे, जो तो देश आपल्याला कच्चे तेल कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत आहे. रशियाहूनचीनच्या बंदराकडे निघालेल्या एका अवाढव्य तेल टँकरने अचानक आपला मार्ग बदलला असून आता हे जहाज भारताच्या दिशेने येत आहे. रशियाने आपल्या 'ब्लॅक गोल्ड'चा (कच्च्या तेलाचा) पुरवठा चीनऐवजी भारताला प्राधान्य देत वळवल्याने जागतिक स्तरावर चर्चा रंगली आहे. 'ब्लूमबर्ग'ने याची माहिती दिली आहे.
नेमकी घडामोड काय?
सॅटेलाईट ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून आले आहे की, हा टँकर सुरुवातीला चीनच्या बंदरासाठी नियोजित होता. मात्र, भारताचा समुद्र पार करून साऊथ चायना सीमध्ये पोहोचलेल्या या जहाजाने मधूनच 'यु-टर्न' घेतला आणि आता ते भारतीय बंदराकडे मार्गस्थ झाले आहे. भारतीय तेल कंपन्या रशियन तेलासाठी चीनच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक दर आणि सुलभ पेमेंट पर्याय उपलब्ध करून देत आहेत, हे या बदलाचे प्रमुख कारण मानले जात आहे.
चीनसाठी मोठा पेच
चीनसाठी हा मोठा राजनैतिक आणि आर्थिक धक्का मानला जात आहे. ज्या रशियन तेलावर चीनचा हक्क मानला जात होता, ते आता भारताच्या वाट्याला येत आहे. यामुळे भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.
भारताला होणारे फायदे
भारत आपल्या गरजेच्या ८०% पेक्षा जास्त तेल आयात करतो. रशियाकडून सवलतीच्या दरात पुरवठा होत होता, परंतू आता रशिया भारताला जास्त दराने कच्चे तेल पुरविणार आहे.