Russia Ukraine War: रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी सांगतात, जा युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा! खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 05:24 PM2022-11-30T17:24:49+5:302022-11-30T17:28:48+5:30

Russia-Ukraine War Updates : "त्या म्हणत आहेत, की जा आणि त्या युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा. फक्त ते आमच्यासोबत शेअर करू नका. आम्हाला सांगू नका."

Russia ukraine war updates go and rape ukraine woman say russian soldier wives | Russia Ukraine War: रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी सांगतात, जा युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा! खळबळजनक दावा

Russia Ukraine War: रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी सांगतात, जा युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा! खळबळजनक दावा

googlenewsNext

रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या नऊ महिन्यांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धाचा अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही. युक्रेनवर रशियाचे आक्रमक हल्ले सुरूच आहेत. तर युक्रेनही पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देत आहे. यातच आता युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेंस्की यांनी रशियन सैनिकांवर मोठा आरोप केला आहे. युक्रेनमध्ये रशियन सैनिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा शस्त्रा प्रमाणे वापर करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओलेना झेलेंस्की यांनी लंडनमध्ये एका आंतरराष्ट्रीय सम्मेलनात बोलताना हे वक्तव्य केले आहे. याच वेळी, रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी युक्रेनियन महिलांवर बलात्कार करण्यास सांगत आहेत, असा दावा ओलेना यांनी केला आहे.

शस्त्राप्रमाणे वापर करतायत रशियन सैनिक -
स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ओलेना झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, रशियन सैनिकांच्या पत्नींनी युक्रेनीयन महिलांवर बलात्कार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. युक्रेनेचे राष्ट्रपती वलोडिमिर झेलेंस्की यांच्या पत्नीने रशियन सैनिकांकडून उघडपणे होत असलेल्या लैंगिक हिंसाचारावर भाष्य केले आहे. त्या पुढे म्हणाल्या, 

"लैंगिक हिंसा हा एखाद्यावर वर्चस्व सिद्ध करण्याचा सर्वात क्रूर आणि सर्वात वाईट मार्ग आहे. अशा हिंसाचाराच्या बळींसाठी, युद्धाच्या वेळी साक्ष देणे कठीण आहे. कारण अशा काळात कुणालाही सुरक्षित वाटत नाही. याचा ते (रशियन सैनिक) शस्त्रासारखा वापर करत आहेत. या युद्धात त्यांच्या शस्त्रागारामध्ये हे आणखी एक शस्त्र आहे. यामुळे, ते याचा उघडपणे वापर करत आहेत.'' 

'जा, युक्रेनिय महिलांवर बलात्कार करा' -
ओलेना यांनी दावा केला आहे, की आम्ही पाहत आहोत की, रशियन सैनिक याबद्दल फार मोकळे आहेत. ते त्यांच्या नातेवाईकांशी फोनवर यासंदर्भात बोलतात, आम्ही फोनवरील संभाषणातून ते पकडण्यात यशस्वी झालो आहोत. एवढेच नाही, तर, ओलेन यांनी दावा केला आहे की, रशियन सैनिकांच्या बायकाच त्यांना यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्या म्हणत आहेत, की जा आणि त्या युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा. फक्त ते आमच्यासोबत शेअर करू नका. आम्हाला सांगू नका. यामुळेच, या विषयावर वैश्विक पातळीवर प्रतिक्रिया यायला हव्यात. तसेच हा युद्धगुन्हा म्हणून मानाला जावा आणि सर्व गुन्हेगारांना जबाबदार धरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Russia ukraine war updates go and rape ukraine woman say russian soldier wives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.