शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेन युद्धात गंगाजळी आटली! पुतीन यांनी उद्योजकांकडे मागितला पैसा, 'चेक' लिहायला घेण्यास सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:33 IST

Russia Ukraine war cost 2026: युक्रेन युद्धामुळे रशियाची तिजोरी रिकामी. व्लादिमीर पुतिन यांनी उद्योगपतींना दिले युद्धासाठी पैसे देण्याचे आदेश. तर क्रेमलिनने दावा फेटाळला.

गेल्या चार वर्षांपासून युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धामुळेरशियाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. एकीकडे मध्यपूर्वेतील युद्धामुळे जगात इंधन संकट निर्माण झाले असताना, दुसरीकडे रशियाची स्वतःची तिजोरी आता रिकामी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील बड्या उद्योगपतींची तातडीची बैठक बोलावून त्यांना युद्धाच्या खर्चासाठी पैसे देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत, असा दावा करण्यात येत आहे. 

यानुसार पुतिन यांनी कबूल केले आहे की, ''युक्रेनमधील लष्करी कारवाईसाठी रशियाच्या बजेटमधील मोठा हिस्सा खर्च होत आहे. यामुळे देशांतर्गत विकासकामांवर परिणाम होत असून तिजोरीवर मोठा बोजा पडला आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही देशासाठी तुमचे चेक लिहायला सुरुवात करावी." युद्धासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी उद्योगपतींनी त्यांच्या नफ्यातील मोठा हिस्सा सरकारी तिजोरीत जमा करावा, असे त्यांनी सुचवले आहे.

पुतिन यांची मजबुरीचार वर्षांच्या युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेले आर्थिक निर्बंध आणि युद्धाचा दररोजचा खर्च यामुळे रशियाला आता अंतर्गत मदतीशिवाय पर्याय उरलेला नाही. रशियाचा खजिना संपल्यास याचा परिणाम जागतिक शस्त्रास्त्र बाजार आणि इंधन पुरवठ्यावरही होऊ शकतो. रशिया सध्या इराण-अमेरिका युद्धात इराणला पाठिंबा देण्याच्या स्थितीत असला, तरी स्वतःची आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने पुतिन यांची चिंता वाढल्याचा दावा वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. 

क्रेमलिनचे स्पष्टीकरणरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशातील बड्या उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना युद्धाच्या खर्चासाठी 'चेक' लिहिण्याचे आदेश दिले, अशा चर्चांना क्रेमलिनने पूर्णविराम दिला आहे. रशियाच्या अधिकृत प्रवक्त्याने स्पष्ट केले की, अशा प्रकारची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. पुतिन आणि रशियन व्यावसायिक नेत्यांच्या भेटीचा उद्देश देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि पाश्चात्य निर्बंधांना तोंड देणे हा होता, असे क्रेमलिनने म्हटले आहे. युद्धासाठी वैयक्तिक निधी मागितल्याच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रशियन अधिकाऱ्यांच्या मते, रशियाची आर्थिक स्थिती कमकुवत आहे हे दाखवण्यासाठी पाश्चात्य माध्यमांकडून अशा प्रकारच्या 'खोट्या बातम्या' पसरवल्या जात आहेत.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाWarयुद्ध