शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

Russia Ukraine War: रशियाचे आपल्याच नागरिकांवर निर्बंध! बँकेतून काढता येणार फक्त 10,000 डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 09:40 IST

Russia Ukraine War: युक्रेनवर आक्रमण झाल्यापासून अनेक देश रशियाच्या विरोधात केले असून, विविध निर्बंध जाहीर करत आहेत. रशियावर नाराज झालेल्या अमेरिका आणि ब्रिटनने मॉस्कोमधून होणार्‍या गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

मॉस्को: मागील अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. यादरम्यान अनेक देश आणि संस्थांनी रशियावर विविध निर्बंध लादले आहेत. यातच आता रशियाने आपल्याच नागरिकांवर बँकेच्या व्यवहारासंबंधी निर्बंध लादल्याची माहिती मिळत आहे. रशियाच्या सेंट्रल बँकेने सांगितले की, रशियाने परदेशी चलन खात्यांमधून (Foreign Currency Accounts) परकीय चलन काढण्यावर मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सेंट्रल बँक ऑफ रशियाने मंगळवारी जाहीर केले की, परदेशी चलन खाते असलेल्या नागरिकांना 9 सप्टेंबरपर्यंत $10,000 पेक्षा जास्त पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. रशियन नगारिकांना पुढील 6 महिन्यांसाठी सेंट्रल बँकेतून $10,000 पर्यंत रक्कम काढता येणार. सीबीआरने एका निवेदनात म्हटले की, ग्राहकाच्या बँक खात्यात कोणतेही विदेशी चलन असले तरी पैसे काढणे केवळ यूएस डॉलरमध्येच केले जाईल.

अनेक देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशिया संतापलासीबीआरने म्हटले आहे की, रशियन बँकांमधील जवळपास 90 टक्के विदेशी चलन खाती USD 10,000 पेक्षा जास्त नाहीत. परकीय चलन ठेवी किंवा खाते असलेल्या 90 टक्के धारकांना त्यांचे पैसे पूर्णपणे रोखीने मिळू शकतील. निवेदनात पुढे म्हटले आहे की, नवीन नियमांच्या अंमलबजावणीदरम्यान, बँका नागरिकांना परदेशी रोकड विकणार नाहीत. सीबीआरने म्हटले आहे की, रशियामध्ये डॉलर्सच्या प्रवाहावर पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे हे विशेष उपाय आणले गेले आहेत.

गॅस, तेल आणि उर्जेच्या आयातीवर बंदी जापान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनीही रशियावर आर्थिक निर्बंध आणि प्रवासी निर्बंध लादले आहेत. रशिया मालमत्ता गोठवण्याचा आणि देशातील सर्वात प्रभावशाली राजकीय आणि लष्करी अधिकार्‍यांवर लादलेल्या प्रवासी बंदीसाठी नवीन दंड लागू करण्याचा विचार करत आहे. युक्रेनवर आक्रमण झाल्यापासून अनेक देश रशियाच्या विरोधात गेले आहेत आणि विविध निर्बंधांची घोषणा करत आहेत. रशियामुळे संतापलेल्या अमेरिका आणि ब्रिटनने मॉस्कोमधून होणार्‍या गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

अमेरिका आणि ब्रिटनने मोठी कारवाई केलीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, अमेरिका रशियाकडून आयात होणाऱ्या वायू, तेल आणि उर्जेवर बंदी घालत आहे. बिडेन म्हणाले की अमेरिकेत रशियन तेल, वायू आणि कोळशाच्या आयातीवर निर्बंध लादल्यास देशात किंमत मोजावी लागेल. त्याचवेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही ब्रिटन रशियाकडून होणाऱ्या तेलाच्या आयातीवर बंदी घालणार असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे आक्रमण संपेपर्यंत त्यांचा देश युक्रेनला शस्त्रे आणि इतर सर्व मदत देत राहील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिका