पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:26 IST2025-06-08T16:26:03+5:302025-06-08T16:26:47+5:30

Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, पण अजून या दोन्ही देशांमधील संघर्ष शांत झालेला नाही.

Russia-Ukraine: Putin's Army hoists Russian flag over another city; takes control of 20 percent Ukrainian territories | पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, पण अजून या दोन्ही देशांमधील संघर्ष शांत झालेला नाही. उलट हे युद्ध दिवसेंदिवस धोकादायक होत चालले आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनने रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला होता, त्याला रशियानेही तेवढ्यात ताकदीने प्रत्युत्तर दिले. एकीकडे युक्रेन रशियाच्या भूमीत घुसून हल्ले करत आहे, तर दुसरीकडे रशियन सैन्य युक्रेनियन शहरांवर सतत ताबा मिळवत आहे.

रशियन संरक्षण मंत्रालयाने रविवारी दावा केला की, त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशातील झोरिया नावाची वस्ती ताब्यात घेतली आहे. या विजयासह रशियाने युक्रेनच्या सुमारे २० टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले आहे. वॉर रिपोर्ट कार्ड-२०२५ आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियन सैन्याने आतापर्यंत युक्रेनमधील १,१२,००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भूभाग ताब्यात घेतला आहे. यामध्ये क्रिमिया, डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझियाचा मोठा भाग सामील आहे. 

मंद पण स्थिर प्रगती
रशियाचे लष्करी यश अचानक घडलेले नाही. लष्करी विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, रशिया आता पूर्व आणि दक्षिण युक्रेनमध्ये मंद पण स्थिर गतीने आपली पकड मजबूत करत आहे. झोर्यासारख्या लहान शहरांवर कब्जा करणे हा या रणनीतीचा एक भाग आहे. हा भाग अव्दिव्का आणि चासिव्ह यार दरम्यान आहे, जो दोन्ही बाजूंसाठी धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे.

युक्रेनचे मर्यादित प्रत्युत्तर 
खेरसन आणि खार्किव सारख्या भागात युक्रेनला काही प्रमाणात यश मिळाले असले तरी, २०२४ च्या शेवटी आणि २०२५ च्या सुरुवातीला त्याच्या प्रत्युत्तरात्मक कारवाया मर्यादित सिद्ध झाल्या आहेत. रशिया आता केवळ आपला ताबा टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला नाही, तर हळूहळू तो विस्तारतही आहे. 

Web Title: Russia-Ukraine: Putin's Army hoists Russian flag over another city; takes control of 20 percent Ukrainian territories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.