शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा युद्ध पेटणार? रशिया-युक्रेन शांतता चर्चा थांबली; झेलेन्स्कींचा पुतिन-ट्रम्प यांच्यावर आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:06 IST

Russia-Ukraine : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर झेलेन्स्कींची नाराजी!

Russia-Ukraine : स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे बुधवारी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चा अचानक संपुष्टात आल्या. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या चर्चांना अत्यंत कठीण आणि तणावपूर्ण असल्याचे सांगत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही जबाबदार धरले आहे. झेलेन्स्की यांनी आरोप केला की, रशिया चार वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाचा शेवट करण्याच्या प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब लावत आहे. 

चर्चा अचानक थांबली...

झेलेन्स्कींच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच रशियाची सरकारी वृत्तसंस्था RIA ने शांतता चर्चा संपल्याची माहिती दिली. रशियाचे मीडिया प्रमुख व्लादिमीर मेडिंस्की यांनी पुढील चर्चा लवकरच होतील, असे सांगितले; मात्र कोणतीही निश्चित तारीख जाहीर केली नाही. दरम्यान, एका युक्रेनी अधिकाऱ्यानेही पुष्टी केली की, जिनिव्हामधील ही बैठक सुमारे दोन तास चालली. मात्र, चर्चा पुढे जाऊ शकली नाही.

ट्रम्प यांच्या भूमिकेवर झेलेन्स्कींची नाराजी

यापूर्वी एका अमेरिकन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, फक्त युक्रेनकडूनच तडजोडीची अपेक्षा व्यक्त करणे योग्य नाही. रशियालाही तेवढीच जबाबदारी घ्यावी लागेल. जर कोणत्याही शांतता योजनेत युक्रेनला पूर्व डोनबासमधील ते प्रदेश सोडण्यास सांगितले गेले, जे रशियाने अद्याप ताब्यात घेतलेले नाहीत, तर युक्रेनची जनता अशा प्रस्तावाला जनमतसंग्रहात नाकारेल. 

चार वर्षांपासून युद्ध सुरू...

ही चर्चा रशियाच्या २०२२ मधील युक्रेनवरील आक्रमणाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या काही दिवस आधी झाली. चार वर्षांपासून सुरू अशलेल्या युद्धात आतापर्यंत लाखो लोक मृत किंवा जखमी झाले आहेत, तर कोट्यवधी नागरिक विस्थापित झाले आहेत. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक शहरे, गावे आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच, युक्रेनच्या सुमारे २०% भूभागावर रशियाचा ताबा आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia-Ukraine Peace Talks Halt; Zelenskyy Blames Putin, Trump

Web Summary : Russia-Ukraine peace talks in Geneva abruptly ended. Zelenskyy criticized Putin and Trump, alleging Russia deliberately delays ending the war. Russia confirmed the talks' end, but future discussions are expected. Zelenskyy demands shared responsibility for peace, warning against ceding territory. The war's fourth anniversary approaches with millions affected.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका