रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:46 IST2025-06-06T16:45:52+5:302025-06-06T16:46:16+5:30

अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला आता निर्णायक दबाव आणावा लागेल. जर जागतिक नेते गप्प असतील, तर हीदेखील एक प्रकारची मिलीभगतच आहे. आता निर्णायक कारवाईची वेळ आहे, युद्ध केवळ पाठिंब्याने थांबणार नाही.

Russia took revenge, Ukraine was shaken More than 400 drones and 40 ballistic missiles wreaked havoc, Zelensky was furious | रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले

रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या २०२२ पासून सुरू असलेले युद्ध अद्यापही थांबण्याचे नाव नाही. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांचा बदला घेत आता रशियाने युक्रेनच्या जवळजवळ सर्वच प्रमुख भागांवर ४०० हून अधिक ड्रोन आणि ४० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. यांत, व्होलिन, लिव्हीव, टेर्नोपिल, कीव, सुमी, पोल्टावा, खमेलनित्स्की, चेरकासी आणि चेर्निहिव्ह यांचा समावेश आहे. यासंदर्भात, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक्सवर भावनिक आणि संतप्त पोस्ट केली आहे. यात, युक्रेनियन हवाई दलाने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडण्यात यश मिळवले. मात्र, तीन आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर ४९ जण जखमी झाले असल्याचे पुष्टी झाली आहे. ढिगारे साफ करण्याचे आणि बचाव अभियान सुरू आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की पुढे म्हणाले, रशिया आपल्या धोरणावर काय आहेत. ते सर्वसामान्यांना लक्ष्य करत आहेत. हे युद्ध आता केवळ युक्रेनचे युद्ध राहिले नाही, तर मानवतेचे युद्ध बनले आहे. रशियाला आंतरराष्ट्रीय उत्तरदायी अंतर्गत आणायला हवे. अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला आता निर्णायक दबाव आणावा लागेल. जर जागतिक नेते गप्प असतील, तर हीदेखील एक प्रकारची मिलीभगतच आहे. आता निर्णायक कारवाईची वेळ आहे, युद्ध केवळ पाठिंब्याने थांबणार नाही.

रशिया-युक्रेनच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय भूमिका -
युक्रेनने सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे की, ते आता एकटे लढून थकले आहे. त्यांनी, नाटो, युरोपियन युनियन, अमेरिका आणि इतर सहकारी देशांना रशियावरील आर्थिक निर्बंध आणखी कठोर करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर, शस्त्रे आणि लष्करी संसाधनांच्या पुरवठ्याचा वेग वाढवावा, राजकीय पातळीवर दबाव आणावा आणि रशियाला वाटाघाटी करण्यासाठी राजी करावे, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Russia took revenge, Ukraine was shaken More than 400 drones and 40 ballistic missiles wreaked havoc, Zelensky was furious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.