रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:42 IST2025-11-19T11:41:42+5:302025-11-19T11:42:17+5:30
India Russia Ties, Pakistan: दिल्ली स्फोटाचा तपास सुरू असतानाच आली मोठी माहिती

रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
India Russia Ties, Pakistan: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला स्फोट झाला. या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. तपास यंत्रणा दररोज छापे टाकत आहेत. सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी या हल्ल्यात अनेकांना अटक केली असून साऱ्यांची चौकशी समोर सुरू आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची तपास यंत्रणांकडून कसून तपासणी आणि चौकशी सुरू असतानाच, भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. रशियानेभारताला एक दमदार ऑफर दिली आहे, ज्यामुळे पाकिस्तानची चिंता भलतीच वाढली आहे.
रशियाने त्यांच्या सर्वात प्रगत पाचव्या एडिशनमधील Su-57E फायटर जेट्सचे अपग्रेडेड व्हर्जन सादर केले आहे. हे व्हर्जन निर्यातसाठी तयार करण्यात आले आहे. भारताला संरक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाची साथ मिळणार असल्याने ही ऑफर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही ऑफर भारत-रशियाच्या सहा दशकांपासूनच्या संरक्षण सहकार्याला पुन्हा बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर येणार असतानाच या ऑफरची चर्चा रंगली आहे.
दुबई एअर शोमध्ये रशियाने Su-57E चे अपग्रेड केलेले मॉडेल रिलीज केले. तसेच भारताला एक व्यापक पॅकेज देखील ऑफर केले. त्यात Su-57E लढाऊ विमानांचा पुरवठा, परवानाकृत उत्पादन, हवेतून सोडल्या जाणाऱ्या शस्त्रांचा एक नवीन गट, भारतीय युद्धसामग्रीचे एकत्रीकरण, दीर्घकालीन देखभाल आणि समर्थन आणि अप्रतिबंधित तंत्रज्ञान हस्तांतरण यांचा समावेश आहे.
Su-57E मध्ये काय खास आहे?
रशियाच्या दाव्यानुसार, हे लढाऊ विमानाच्या सर्व गोष्टींची पूर्तता करते. शत्रूला न दिसता हल्ले करण्याची क्षमता त्यात आहे. या जेटमध्ये लांब अंतरापर्यंत सुपरसॉनिक वेग राखण्याची क्षमता आहे. कॉकपिट स्वयंचलित आहे. त्यामुळे एआयच्या मदतीने वैमानिक जलद निर्णय घेऊ शकतात. त्याचे ऑनबोर्ड AESA रडार २४० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य शोधू शकते. हे जेट धोकादायक तर आहेच, पण त्यासोबत शस्त्रांसह एक मिनी-पायलट म्हणून देखील काम करते.
पाकिस्तानची चिंता का वाढली?
रशियाकडून मिळालेल्या या ऑफरमुळे भारताला एक स्टेल्थ लढाऊ विमान मिळणार आहे. हे एक उच्च-तंत्रज्ञान आणि भविष्यकालीन संरक्षण क्षमता ओळखून बनवलेले जेट आहे. शत्रूच्या नजरेस न पडता हल्ला करण्यास हे सक्षम आहेत. यामुळे भारताची लष्करी शक्ती एका नवीन पातळीवर नेण्यात मदत होणार आहे.