शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रशियाचे लष्करी विमान कोसळले; २९ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:47 IST

क्रिमियामध्ये रशियाचे लष्करी विमान (An-26) डोंगराच्या कडेवर आदळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला असून तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाने आधीच धुमसत असलेल्या क्रिमिया परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण बातमी समोर आली आहे. रशियाचे ‘An-26’ हे लष्करी मालवाहू विमान बुधवारी सकाळी एका उंच पहाडाला धडकून भीषण अपघाताचा बळी ठरले. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत विमानातील सर्व २९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये रशियन लष्कराचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रशियन हवाई दलाचे An-26 हे विमान बुधवारी सकाळी आपले नियमित उड्डाण करत होते. मात्र, काळ्या समुद्राच्या किनारपट्टीवर असलेल्या क्रिमिया द्वीपकल्पावर पोहोचल्यानंतर विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क अचानक तुटला. काही वेळातच हे विमान एका दुर्गम डोंगराळ भागातील कडेवर जाऊन आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसताच विमानाचे तुकडे झाले आणि विमानाने पेट घेतला. रशियन वृत्तसंस्था 'तास'ने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला विमानाचा ढिगारा सापडला असून, हा अपघात इतका भीषण होता की दुर्घटनेत कुणीही जिवंत वाचण्याची शक्यता उरलेली नाही.

२३ प्रवासी अन् ६ क्रू मेंबर्सचा मृत्यू

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. विमानात एकूण २९ जण स्वार होते, ज्यामध्ये २३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्सचा समावेश होता. या सर्वांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, खराब हवामान किंवा विमानातील तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले असावे आणि विमान थेट डोंगराच्या कड्यावर आदळले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

२०१४ मध्ये रशियाने युक्रेनकडून क्रिमियाचा ताबा घेतल्यापासून हा भाग लष्करीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. अशा तणावपूर्ण वातावरणात लष्करी विमानाचा अपघात झाल्याने रशियन लष्कराच्या हवाई मोहिमांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. An-26 हे सोव्हिएत काळातील जुन्या बनावटीचे विमान आहे. रशियाने १९७२ मध्ये हे विमान सेवेत दाखल केले होते. जुन्या तंत्रज्ञानामुळेच हा घात झाला का, याचा तपास आता रशियन तज्ज्ञांकडून केला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातrussiaरशियाPlane Crashविमान दुर्घटना