रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:56 IST2025-10-02T14:55:07+5:302025-10-02T14:56:10+5:30
JF-17 हे 4.5 जनरेशनचे फायटर जेट आहे. आता पाकिस्तान ब्लॉक III बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडे ब्लॉक I आणि ब्लॉक II आधीपासूनच आहेत, परंतु हे तुलनेने कमकुवत मानले जातात.

रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नवी दिल्ली: भारत आणि रशियाचे संबंध अद्यापपर्यंत अत्यंत चांगले राहिले आहेत. मात्र असे असतानाही, भारताच्या सातत्याने केलेली विनंती बाजूला सारून, रशियाने पाकिस्तानला JF-17 फायटर जेटचे इंजिन सप्लाय करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजिन चीन JF-17 जेटसाठी तयार करतो. मात्र, त्याची निर्मिती रशियावर अवलंबून आहे.
'डिफेंस सिक्योरिटी एशिया' ने दिलेल्या माहितीनुसार, भारताने रशियाला दीर्घकाळ हे इंजिन पाकिस्तानला देऊ नये, अशी विनंती अथवा आग्रह केला होता. मात्र, तरीही मॉस्कोने भारताच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे. पाकिस्तानी हवाई दल आपली शक्ती वाढवण्याची चीनची मदत घेत असतो. JF-17 हे 4.5 जनरेशनचे फायटर जेट आहे. आता पाकिस्तान ब्लॉक III बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडे ब्लॉक I आणि ब्लॉक II आधीपासूनच आहेत, परंतु हे तुलनेने कमकुवत मानले जातात.
पुतीन डबल गेम तर खेळत नाही ना?
एकीकडे रशिया भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याच्या प्रयत्नांत असतो आणि आता पाकिस्तानशीही हातमिळवत आहे. हा डबल गेम तर नाही ना? खरे तर, पुतिन यांनी भारताची विनंती फेटाळून एकप्रकारे दुहेरी गेम खेळत असल्याचे संकेत दिले आहेत.
चीन आणि पाकिस्तान यांच्यातील घट्ट नाते
भारताचे चीनसोबतचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. पण, चीन आणि पाकिस्तानचे नाते अतिशय दृढ आहे. पाकिस्तानी सैन्याचे बहुतेक शस्त्रास्त्रे आणि विमाने चीनवर अवलंबून आहेत.