भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:10 IST2025-04-25T18:08:13+5:302025-04-25T18:10:31+5:30

Bomb Blast in Pakistan: या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असीम मुनीरसाठी एक नवीन आव्हान आहे.

Roadside Bomb Blast in Pakistan's Balochistan Province 4 soldiers killed | भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू

भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर मोठा हल्ला झाला. बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथील मार्गट चेकपोस्टजवळ एका वाहनाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात पाकिस्तानच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. हा बॉम्ब स्फोट कोणी केला? हे समजू शकलेले नाही. परंतु, बलुच अतिरेक्यांनी हा बॉम्ब स्फोट केल्याचा दाट संशय आहे. अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असीम मुनीरसाठी एक नवीन आव्हान आहे.

सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वेट्टा येथील मार्गट चेकपोस्टजवळ एका वाहनाजवळ बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात पाकिस्तानच्या चार निमलष्करी जवानांचा मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाला. या स्फोटात शहजाद अमीन, अब्बास, खलील आणि जाहिद यांचा मृत्यू झाला. तर, जफर, फारूक आणि खुर्रम सलीम गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैनिक सर्तक झाले आणि त्यांनी परिसराला वेढा घातला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांना लवकरच पकडून शिक्षा करण्याचे आश्वासन दिले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी अलिकडच्या काही महिन्यांत बलुचिस्तानमध्ये हल्ले करणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीवर संशय व्यक्त केला जात आहे.

याआधीही बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले झाले आहेत. दरम्यान, १५ एप्रिल रोजीही असाच हल्ला झाला होता, ज्यात पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. एका मोटारसायकलवर हा बॉम्ब ठेवण्यात आला.  बलुचिस्तान प्रांतातील मास्तुंग शहरात एक बस ४० पोलिसांना घेऊन जात असताना हा स्फोट झाला. या स्फोटात तीन पोलिसांचा मृत्यू झाल. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

Web Title: Roadside Bomb Blast in Pakistan's Balochistan Province 4 soldiers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.