इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:26 IST2025-08-30T18:01:12+5:302025-08-30T18:26:17+5:30
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने वेस्ट नुसा टेंगारा पेकालोंगन आणि सिरेबॉनच्या विधानसभा इमारतींना आग लावली.

इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
इंडोनेशियात लोकप्रतिनिधींच्या वेतनावरून गोंधळ सुरू झाला आहे. संतप्त जमावाने तीन प्रांतांच्या विधानसभा इमारतींना आग लावली. यामध्ये पश्चिम नुसा तेंगारा, पेकालोंगन आणि सिरेबॉनच्या विधानसभा इमारतींचा समावेश आहे. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
निदर्शकांनी सुराबाया येथील पोलिस मुख्यालयावरही हल्ला केला. सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला. निदर्शकांनी फटाके आणि लाठ्याकाठ्यांनी प्रत्युत्तर दिले.
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष
देशात आधीच वाढती बेरोजगारी, कर यातच लोकप्रतिनिधींचा नवीन भत्ता. याविरोधात लोक निदर्शने करत होते. दरम्यान, अन्न वितरण करणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसांच्या वाहनाने धडक दिल्याने आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर निदर्शने व्यापक आणि हिंसक झाली. यानंतर, अनेक शहरांमध्ये पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष सुरू झाला.
आमदारांच्या पगारावरून निषेध
सोमवारपासून जकार्तामध्ये हे आंदोलन सुरू झाले. सर्व खासदारांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त दरमहा ५० दशलक्ष रुपया गृहनिर्माण भत्ता मिळतो. हे गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. हे जकार्तातील किमान वेतनाच्या सुमारे १० पट आहे.