शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नेपाळसाठी सीमा प्रश्न सोडवण्याची हीच योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:53 IST

प्रा. जायसवाल : भारतातही ‘राष्ट्रवादी’ सरकार

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजकारण कोण करीत नाही? सर्वच देशांमधील सत्ताधारी करतात. हा मुद्दा आधीपासून होता; पण नेपाळने आताच उकरून काढला हा भारतीय प्रसारमाध्यमांचा आक्षेप योग्य नसल्याचे काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठातील परराष्ट्र संबंध व डिप्लोमसी विभागातील डॉ. प्रमोद जायसवाल यांनी सांगितले.डॉ. जायसवाल नेपाल इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल को आॅपरेशन अ‍ॅण्ड एंगेजमेंटमध्ये रिसर्चचे डायरेक्टर असून, त्यांनी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्ययन व अध्यापनही केले आहे. २००६ ते २०१४ दरम्यान ते दिल्लीत होते. ८ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लिपुलेख मार्गाचे उद्घाटन केल्यावरच नेपाळमधील सामान्य लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. स्थानिकांच्या दबावामुळेच सरकारने भारताला विरोध दर्शवला. भारतदेखील शेजारी देशांशी सीमाप्रश्नावरून संघर्ष करतो आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ नेपाळला वाटली. हा मुद्दा आताच नेपाळने उकरून काढलेला नाही. परराष्ट्र संबंधांचा अभ्यास सुरू केल्यापासून मी या प्रश्नाविषयी ऐकले आहे, असेही ते म्हणाले.मुद्दा संपला नाहीपंतप्रधान के.पी. ओली यांनी स्वत:ची राष्ट्रवादी प्रतिमा बळकट करण्यासाठी व सरकार स्थिर ठेवण्यासाठी लिपुलेख वाद उकरून काढल्याच्या आरोपावर ‘भारतातही राष्ट्रवादी विचारांचे सरकार आहे’, असा प्रतिप्रश्न केला. गेल्या ७० वर्षांत हा मुद्दा संपला नाही. नेहरूंच्या काळापासून सुरू आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक मुद्दे चर्चा करून निकाली काढले. नेपाळने नेहमी संयमी भूमिका घेतली. भारताला सहकार्य केले, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Nepalनेपाळ