जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 09:07 IST2025-09-08T09:06:55+5:302025-09-08T09:07:51+5:30
येमेनच्या हुती बंडखोरांनी लाल समुद्रातील इंटरनेट केबलला लक्ष्य केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
नवी दिल्ली : लाल समुद्रात सौदी अरेबियातील जेद्दाह किनाऱ्याजवळ दोन महत्त्वाच्या फायबर ऑप्टिक केबल प्रणालींमध्ये बिघाड झाल्याने दक्षिण आशियासह अनेक देशांमधील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे.
येमेनच्या हुती बंडखोरांनी लाल समुद्रातील इंटरनेट केबलला लक्ष्य केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
हमासविरोधातील युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्यासाठी बंडखोरांनी हे कृत्य केल्याची शंका व्यक्त केली आहे. मात्र, यापूर्वी बंडखोरांनी अनेकदा आम्ही इंटरनेट केबलला लक्ष्य करत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतातील इंटरनेट सेवेवर परिणाम नाही
उपग्रह कनेक्शन व जमिनीवरील केबलसह समुद्राखालील केबल्स हा इंटरनेटचा एक आधार आहे.
लाल समुद्रात इंटरनेट केबल खराब झाली असली तरी आमच्या इंटरनेट व डेटा कनेक्टिव्हिटी सेवांवर आतापर्यंत कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचा दावा काही भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी केला आहे.
मायक्रोसॉफ्टने मात्र केबल खराब झाल्याने इंटरनेटचा वेग कमी झाल्याचे म्हटले आहे.