शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

धक्कादायक! जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र समूहांकडून अल्पवयीनांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:15 IST

माओवादी समूहांनी शस्त्रास्त्रे व आयईडी हाताळण्यासाठी छत्तीसगढ व झारखंडमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना जबरदस्तीने भरती केले आहे. ते कधी कधी त्यांचा वापर मानवी ढाल म्हणूनही करतात.

वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरमध्ये सरकारविरोधी कारवायांसाठी सशस्त्र समूह १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना भरती करून घेतात व त्यांचा वापर करतात, असा धक्कादायक अहवाल अमेरिकेने तयार केला आहे. विदेश मंत्रालयाचा ‘२०२० ट्रॅफिकिंग इन पर्सन’ हा अहवाल विदेशमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जारी केला आहे. यात म्हटले आहे की, माओवादी समूहांनी शस्त्रास्त्रे व आयईडी हाताळण्यासाठी छत्तीसगढ व झारखंडमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना जबरदस्तीने भरती केले आहे. ते कधी कधी त्यांचा वापर मानवी ढाल म्हणूनही करतात.अहवालानुसार, भारताने २०१९ मध्ये मानवी तस्करी संपवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अहवालात म्हटले आहे की, राज्येतर सशस्त्र समूह जम्मू-काश्मीरमध्ये थेट सरकारविरोधी कारवाया करण्यासाठी १४ वर्षांपर्यंतच्या किशोरवयीनांना सतत भरती करीत आहेत व त्यांचा वापर करीत आहेत. पूर्वेत माओवादी समूहांशी संबंधित काही महिला व मुलींनी सांगितले की, माओवादी तळांमध्ये लैंगिक शोषणही केले जाते. नक्षली समूहांनी पद्धतशीरपणे बालकांची भरती केली व त्यांचा वापर केला.तस्करी रोखण्यासाठी भारताने पावले उचललीभारताने मानवी तस्करी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली; परंतु न्यूनतम मानक पूर्ण केले नाहीत. त्यामुळे भारताला दुसऱ्या श्रेणीत ठेवले आहे. या अहवालात पाकिस्तानचा दर्जा कमी करून त्या देशाला श्रेणी दोनच्या निगराणी यादीत ठेवली आहे. कारण तेथील सरकारने याबाबत योग्य पावले उचलली नाहीत. या यादीत चीनचे नाव सर्वांत खाली म्हणजे तिसºया श्रेणीत आहे. कारण त्या देशाच्या सरकारने मनवी तस्करी रोखण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केले नाहीत. अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व व्हाईट हाऊसची शीर्ष सल्लागार इवांका ट्रम्प यांच्या उपस्थितीत हा अहवाल जारी केला. त्यावेळी पॉम्पिओ म्हणाले की, चीनची कम्युनिस्ट पार्टी व सरकारी उपक्रमाने नागरिकांना बेल्ट आणि रोड योजनेत अत्यंत वाईट स्थितीत काम करण्यासाठी बाध्य केले.>एनआयएला आंतरराज्यीय मानवी तस्करीच्या चौकशीचे अधिकारमानवी तस्करी संपवण्यासाठी भारताने मानक पूर्ण केले नाहीत; परंतु त्या देशाने त्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे भारताला दुसºया श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. बिहारमध्ये सरकारी मदतप्राप्त एका आश्रयगृहाच्या प्रकरणात आरोपींविरुद्ध कडक पावले उचलण्यात आली.या प्रकरणात राज्य सरकारच्या ३ अधिकाऱ्यांसह १९ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. माजी आमदारासह १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. मानवी तस्करीविरोधी विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्व ७३२ जिल्ह्यांत पोलिसांच्या मानव तस्करविरोधी शाखेचा विस्तार करण्यासाठी निधीची तरतूद केली जात आहे. राष्टÑीय तपास यंत्रणेला (एनआयए) आंतरराज्यीय मानव तस्करीची चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत.

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला