शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या पाण्यात विक्रमी कपात

By admin | Updated: June 14, 2015 02:17 IST

गेल्या चार वर्षांपासून दुष्काळात होरपळून निघत असलेल्या कॅलिफोर्निया प्रांताने शेतकऱ्यांना पाणी वापरात कपात करण्याचे आदेश दिले

वॉशिंग्टन : गेल्या चार वर्षांपासून दुष्काळात होरपळून निघत असलेल्या कॅलिफोर्निया प्रांताने शेतकऱ्यांना पाणी वापरात कपात करण्याचे आदेश दिले असून अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी पाणी कपात आहे. आपण पाणी उपशाचे अधिकार असलेल्या १०० जणांना तीन स्वतंत्र जलमार्गातील पाण्याचा उपसा थांबविण्याचे आदेश देणार आहोत, असे प्रांताच्या जल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जाहीर केले. यातील अनेक शेतकऱ्यांचे पाणी उपशाचे अधिकार १०० वर्षे जुने असून पाणी कपातीचा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. सॅक्रामेन्टो, सान जोआक्विन व त्रिभूज पाणलोट क्षेत्रातील पाणी उपशाचे अधिकार असलेल्यांना या स्रोतातून पाणी घेणे थांबवावे लागणार आहे. प्रशासनाने एक एप्रिलला शहरी पाणी वापरात २५ टक्के कपातीची घोषणा केली. तेव्हा शहरी नागरिकांनी लगेच ८० टक्के पाणी कृषीसाठी वापरले जात असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे शहरी नागरिक विरुद्ध शेतकरी असे चित्र निर्माण झाले होते; मात्र शुक्रवारच्या आदेशाचा शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याने हा असमतोल दूर झाल्याचे बोलले जाते. प्रो. लुंड यांना मात्र हा दृष्टिकोनच असंतुलित आणि अयोग्य वाटतो. गेल्या तीन वर्षांपासून कृषीची पाणी कपात सुरू आहे, तर दुष्काळाची झळ शहरवासियांना अलीकडे बसू लागली आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)हे आदेश आवश्यक व अपेक्षितच होते, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील स्थापत्य व पर्यावरण अभियांत्रिकीचे प्रोफेसर जे लुंड यांनी सांगितले. कॅलिफोर्नियात प्रचंड दुष्काळ पडलेला आहे. विशेषत: सान जोआक्विन खोऱ्याची स्थिती भयंकर आहे, असे ते म्हणाले. कॅलिफोर्नियात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती असून १९७० नंतर प्रांत सरकारने यावर्षी प्रथमच पाणी उपशाचे अधिकार असलेल्यांना पाणी कपातीस भाग पाडले आहे.