शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

Coronavirus : इटलीनंतर आता स्पेन, एकाच दिवसात 832 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 7:12 PM

युरपमधील इटलीला कोरोनाने सर्वाधिक तडाखा दिला आहे. एकाच दिवसात स्पेनपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू इटलीमध्ये  झाला आहे. येथे शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 969 जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देस्पेनमध्ये कोरोना संसर्गामुळे मरणारांचा आकडा 5,690वर युरपातील इटलीला कोरोनाचा सर्वाधिक तडाखा स्पेनमध्ये तब्बल 72,248 लोकांना कोरोनाची लागण

माद्रिद - कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीत घेतले आहे. याचा सर्वाधिक फकटा युरोपला बसला आहे. येथून दिवसागणीक मृत्यूचे नवनवे आकडे समोर येत आहेत. इटलीनंतर आता स्पेनही अत्यंत वेदनादायक परिस्थितीतून मार्गक्रमण करताना दिसत आहे. येथे कोरोणामुळे एकाच दिवसात तब्बल 832 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

युरपमधील इटलीला कोरोनाने सर्वाधिक तडाखा दिला आहे. एकाच दिवसात स्पेनपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू इटलीमध्ये  झाला आहे. येथे शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 969 जणांचा मृत्यू झाला.

माद्रिदमधील स्थिती सर्वात वाईट -आता स्पेनमध्ये कोरोना संसर्गामुळे मरणारांचा आकडा 5,690वर पोहोचला आहे. येथे गेल्या 24 तासांत 8000 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. स्पेनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे तब्बल 72,248 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4,575 लोकांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर 12,285 लोक बरे झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी येथे 769 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक खराब स्थिती माद्रिदमध्ये आहेत.

अमेरिकेत सर्वाधिकि रुग्ण - अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्या पार पोहोचला आहे. तेथे आतापर्यंत कोरोनामुळे 1544 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार काल 24 तासांत तेथे सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 लाख 717च्या पुढे गेला आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात  आतापर्यत 27,370 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास 6,00,000 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1,33,373 लोक बरे झाल्याची माहिती आहे. यामुळे भारतात आतापर्यंत  20 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीAmericaअमेरिकाUnited Statesअमेरिका